शहरं
Join us  
Trending Stories
1
इसकी टोपी उसके सर और उसकी...; कोकाटे आणि दत्तात्रय भरणे यांच्यातील मंत्रि‍पदाची आदलाबदली!
2
प्रांजल खेवलकरच्या लॅपटॉपमध्ये अनेक महिलांचे पार्टी अन् त्यानंतरचे आक्षेपार्ह व्हिडिओ!
3
IND vs ENG 5th Test Day 1 Stumps: नायर-वॉशिंग्टन जोडी जमली अन् टीम इंडियावरील मोठं संकट टळलं!
4
विधानसभेच्या निकालांमध्ये तफावत नाही; ईव्हीएम तपासणीनंतर निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण
5
माल चाहिए क्या? xxx वाला? विचारल्यानंतर खेवलकर म्हणाले होते, 'ठेवून घ्या'! चॅटिंग आलं समोर
6
Karun Nair Fifty : 'त्रिशतकवीर' करुण नायरच्या भात्यातून ३१४६ दिवसांनी आली 'फिफ्टी'!
7
Nashik Crime: भयंकर! पत्नीला गुंगीचे औषध पाजून नग्नावस्थेत बनवले व्हिडिओ, दोन वर्ष डान्स बारमध्ये नाचायला लावले
8
उत्तर प्रदेशमधील मंत्र्यांनी आपल्याच सेक्रेटरीला पाठवलं तुरुंगात, कारण वाचून तुम्ही म्हणाल...
9
सरकारी नोकरी शोधणाऱ्यांसाठी उत्तम संधी, लवकरच ओआयसीएलमध्ये मोठी भरती!
10
IND vs ENG: टीम इंडियासोबत पाचव्या कसोटीत 'चिटींग'? पंच कुमार धर्मसेना यांच्यावर नेटकऱ्यांचा आरोप
11
"भगवा नाही, सनातनी किंवा हिंदुत्ववादी दहशतवाद म्हणा"; अमित शाहांचा उल्लेख करत पृथ्वीराज चव्हाणांचे गंभीर विधान
12
सात वर्षांत ४२ वेळा तिने दिला नकार, अखेर ४३व्यावेळी त्यानं केलं असं काही, नकारच देऊ शकली नाही ती
13
Shubman Gill Run Out : साईला कॉल देत गिलनं उगाच केली घाई! इंग्लंडला फुकटात मिळाली विकेट (VIDEO)
14
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी भाजपची रणनीती! माजी खासदार-आमदारांवर सोपवली मोठी जबाबदारी
15
IND vs ENG : 'ती' साथ देणार अशा परिस्थितीत त्यानं विश्रांती घेतली; सोशल मीडियावर बुमराह झाला ट्रोल
16
आमदाराच्या कारची दुचाकीला धडक, रेल्वे पुलावरून खाली कोसळून तरुणाचा मृत्यू, मृत तरुण भाजपा नेत्याचा भाऊ  
17
बांगलादेशी मॉडेलला भारतात अटक! पोलिसांनी राहत्या घरावर टाकली धाड अन् आत जे सापडलं...
18
Anilkumar Pawar ED Raid: अनिलकुमार पवार यांना त्यांच्या आईने गिफ्ट केलेला नाशिकमधील प्लॉट जप्त
19
कृषीखातं पुन्हा धनंजय मुंडेंकडे? सह्याद्री अतिथीगृहावर भेटीगाठींना वेग!
20
निवडणूक जिंकणं कठीण की पत्नीचं मन? राघव चड्डांनी दिलं असं उत्तर, परिणीतीही झाली अवाक्

सणसर मुक्कामी सोहळा

By admin | Updated: June 28, 2014 22:49 IST

जगद्गुरू श्रीसंत तुकाराम महाराज पालखी सोहळा सणसर या इंदापूर तालुक्यातील पहिल्या मुक्कामी शनिवारी सायंकाळी विसावला.

भवानीनगर : जगद्गुरू श्रीसंत तुकाराम महाराज पालखी सोहळा सणसर या इंदापूर तालुक्यातील पहिल्या मुक्कामी शनिवारी सायंकाळी विसावला. रुसलेल्या वरूणराजाला साकडे घालत पंचक्रोशीतील शेतकरी ग्रामस्थांनी पालखी सोहळ्याचे जोरदार स्वागत केले.  
बारामती शहरातून पहाटे पालखी सोहळा काटेवाडीकडे मार्गस्थ झाला. येथे पालखी सोहळ्यातील मेंढय़ांचे रिंगण पार पडले. तत्पूर्वी मोतीबाग येथे बारामती फोटोग्राफर असोसिएशनच्या वतीने वडापाव, चहाचे वाटप करण्यात आले. पिंपळी येथे सुयश अॅटो पतसंस्थेच्या वतीने अध्यक्ष भारत जाधव, उपाध्यक्ष पोपट घुले यांनी केळी वाटप केले. लिमटेक येथे सरपंच मंदाकिनी वाघ,सदस्य संतोष ढवाण ,दादा दळवी,धीरज जाचक,रमेश देवकाते,गोकुळ बर्गे,बापूराव पवार,धनाजी गावडेआदींनी स्वागत केले.यावेळी जिल्हा परिषदेच्या शाळेच्या विद्याथ्र्याच्या लेझीम पथकाने पालखी सोहळ्याचे स्वागत केले.
त्यानंतर काटेवाडी येथे पालखी सोहळा विसावला. यावेळी छत्रपती शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रशांत काटे, संजय काटे,हनुमंतराव काटे, अनिल काटे, विद्याधर काटे, महादेव कचरे, दत्तात्रय काटे, कुमार काटे,राजेंद्र जगताप,सोमनाथ माने, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष अमोल काटे, जितेंद्र काटे,प्रकाश टेंगले, काटेवाडी सोसायटीचे अध्यक्ष दादासो खरात, उपाध्यक्ष दत्तात्रय पानसरे, ग्रामसेवक अमोल घोळवे आदींनी पालखी सोहळ्याचे स्वागत केले. 
काटे मोटार  फोर्सच्या वतीने चहा बिस्किटाचे वाटप,शारदा प्रतिष्ठानच्या वतीने  लिंबूसरबत व संभाजी ब्रिगेडच्या वतीने चहा वाटप ,ढेकळवाडी येथील श्रीरामजप संकुलाच्या वतीने मिष्टान्न भोजन देण्यात आले. सणसर येथे उद्योजक विनायक निंबाळकर यांच्या वतीने गुडदानी वाटप करण्यात आले.
 
4रिंगण सोहळ्यानंतर सायंकाळी इंदापूर तालुक्यात भवानीनगर (ता. इंदापूर) येथे पालखी सोहळ्याचा प्रवेश झाला. यावेळी छत्रपती कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब घोलप यांनी सोहळ्याचे स्वागत केले. यावेळी संचालक हरिश्चंद्र देवकाते यांच्या हस्ते पुजा करण्यात आली.   उपाध्यक्ष बाळासाहेब पाटील ,गटविकास अधिकारी डॉ.वडापूरे, माजी अध्यक्ष अविनाश घोलप,तहसीलदार संजय पवार, संचालक दयाराम सरक, अशोक नवले, निवृत्ती सोनवणो, नानासाहेब दराडे, कार्यकारी संचालक आर. एस. नाईक, सभापती सारिका काळे, सणसरचे सरपंच विजय पाटील, मुख्याध्यापक एस. बी. थोरात,भाऊसाहेब सपकळ, युवराज रणवरे,पांडुरंग निंबाळकर,सचिन सपकळ, अमोल भोईटे, वसंतराव जगताप,वसंत पवार , अनिल पवार, श्रीनिवास कदम आदींनी स्वागत केले. माजी सरपंच पांडुरंग निंबाळकर, माजी सभापती तुकाराम काळे आदींनी पालखीचे स्वागत केले. त्यानंतर पालखी सोहळा सणसरच्या बाजार तळावर विसावला. दरम्यान, पालखी सोहळ्यातील पहिले अश्वरिंगण रविवारी सकाळी बेलवाडी येथे पार पडणार आहे.
 
वारक:यांना पाणी बाटल्यांचे वाटप
दौंड : भीमथडी शिक्षण संस्थेतील सेवकवर्गातर्फे संत तुकाराममहाराज पालखी सोहळ्यातील वारक:यांना पाणीवाटप करण्यात आले. शाळेतील कनिष्ठ महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना व राष्ट्रीय छात्र सेना योजनांच्या स्वयंसेवकांनी पाणीवाटप केले. पाणीवाटप कार्यक्रमाचे उद्घाटन भीमथडी शिक्षण संस्थेचे सदस्य विक्रम कटारिया यांनी केले. या वेळी प्रशालेचे पर्यवेक्षक मोहन खळदकर, उपशिक्षक शिवाजी रसाळ, प्रदीप म्हस्के, चंद्रवन गाढवे, मल्हारी रोकडे, एनएसएसचे विशाल ओव्हाळ, प्रशांत निकम, शिवराज शितोळे आदी उपस्थित होते. गुंजखिळा येथे पाण्याच्या बाटल्यांचे वाटप करण्यात आले.
 
4ग्रामस्थांच्यावतीने पालखीसमवेत असणा:या सर्व वारक:यांना मिष्ठान्न भोजन देण्यात आले. येथील जय भवानी तरुण मंडळाच्या वतीने या कार्यक्रमाची व्यवस्था करण्यात आली होती. रात्री पालखी तळावर प्रख्यात प्रवचकार हभप प्रमोदमहाराज जगताप यांचे वाटचालीचे कीर्तन झाले.
4पालखी येथील लोणकर मळ्यात दुपारी विसाव्यासाठी थांबल्यानंतर भारुडाचा कार्यक्रम झाला. यावेळी येथील तरुण मंडळाच्यावतीने अल्पोहार तसेच चहापानाचे आयोजन करण्यात आले होते. तसेच मुख्य पेठेतुन ठिकठिकाणी वारक:यांना खाऊचे वाटप करण्यात आले. 
 
4काटेवाडी (ता. बारामती) येथे धोतराच्या पायघडय़ा टाकून जगद्गुरू श्रीसंत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे उत्साही स्वागत करण्यात आले. दुपारी 3 वाजता पालखी रथाभोवती पार पडलेल्या मेंढय़ांच्या वैशिष्टय़पूर्ण रिंगणाने भाविकांच्या डोळ्यांचे पारणो फेडले.  
4बारामती शहरात पहाटे मुख्याधिकारी रवि पवार यांच्या हस्ते महापूजा करण्यात आली. शनिवारी पहाटे प्रस्थान ठेवल्यानंतर पिंपळी, लिमटेक येथील स्वागत सत्कार स्वीकारत काटेवाडीत पालखी सोहळा विसावला. या पालखी सोहळ्याचे बारामती टेक्स्टाईल पार्कच्या अध्यक्षा सुनेत्र पवार,  सरपंच गौरी काटे, उपसरपंच जयश्री सुतार,एकनाथ काटे आदींनी स्वागत केले. या वेळी पालखी दर्शन मंडपात पालखी नेण्यासाठी परीट समाजाच्या वतीने धोतराच्या पायघडय़ा घालण्यात आल्या. 
4गावच्या वेशीपासून बँड पथक, श्री छत्रपती हायस्कूलच्या  विद्यार्थिनीनच्या लेझीम पथकासमवेत हरिनामाच्या गजरात मोठय़ा उत्साहात ग्रामस्थांनी पालखी खाद्यांवरून नेली. त्यानंतर वारकरी भाविकांनी गावामध्ये भोजनाचा आस्वाद घेतला. दर्शन मंडपामध्ये दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. त्यानंतर दुपारी 3 वाजता मेंढय़ांचे वैशिष्टय़पूर्ण रिंगण पार पडले. संभाजी काळे, हरि महारनवर, तात्यासो मासाळ यांच्या मेंढय़ांचा त्यामध्ये समावेश होता. यावेळी काटेवाडी ग्रामपंचायतीच्या वतीने पालखी रथावर पुष्पवृष्टी करण्यात आली. 
4काटेवाडी येथे पालखीच्या स्वागतासाठी पताका, स्वागतकमानी लावून सजावट करण्यात आली होती. तर दर्शन मंडप सभागृह फुलांच्या माळांनी सजविले होते. वारक:याच्या सेवेसाठी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने आरोग्य सेवा पुरविण्यात आली. वारकरी भाविकांनी निर्मलग्राम काटेवाडीचा फेरफटका मारला. रिंगण सोहळा पाहण्यासाठी भाविकांनी दुर्तफा मोठी गर्दी केली होती. उपमुख्यमंत्र्यांच्या मातोश्री आशादेवी पवार, नीता पाटील, गटविकास अधिकारी राहुल काळभोर, सहायक पोलीस निरीक्षक चंद्रकांत कांबळे यांनी तालुक्याच्या वतीने निरोप दिला. काटेवाडीच्या रिंगण सोहळ्यानंतर इंदापूर तालुक्यात भवानीनगर येथे पालखी सोहळ्याचा प्रवेश झाला.