शहरं
Join us  
Trending Stories
1
शस्त्रसंधीची चर्चा भारत-पाकिस्तानमध्येच, डोनाल्ड ट्रम्प यांचा काहीही संबंध नाही; विक्रम मिस्रींनी संसदीय समितीला सगळं सांगितलं
2
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?
3
साताऱ्यात चीड आणणारी घटना! चुलत भावाकडून १३ वर्षीय बहिणीवर अनेकदा बलात्कार
4
IPL 2025 : भर मैदानात अभिषेक अन् दिग्वेश यांच्यात वाजलं; नेमकं काय घडलं? (VIDEO)
5
राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेतृत्वात लवकरच बदल दिसेल; रोहित पवारांचं विधान
6
कॅपिटल गेन टॅक्स काय असतो, कोणत्या प्रकारे आणि किती द्यावा लागतो? सगळं गणित समजून घ्या
7
'मीदेखील या गोष्टीला बळी पडलोय', सरन्यायाधीश प्रोटोकॉल प्रकरणावर उपराष्ट्रपतींची प्रतिक्रिया
8
निक्की आधी बॅटिंगला येऊन पंतचा पुन्हा फ्लॉप शो! Sanjiv Goenka यांनी असा काढला राग
9
'ऑपरेशन सिंदूर' आधी पाकिस्तानला दिली होती माहिती?; परराष्ट्र सचिवांनी संसदीय समितीत केला खुलासा
10
IPL 2025 : विदर्भकराचं स्वप्न झालं साकार! पण विकेटमागे इशान किशननं घोळ घातला, नाहीतर...
11
Rain update: साताऱ्यात धडाम् धूम! वळवाची दमदार हजेरी, शहरातील वीजपुरवठा खंडित
12
ट्रॅक्टर-ऑटोचा भीषण अपघात, तीन जागीच ठार; लातूर-बार्शी महामार्गावरील घटना
13
Shocking: व्हिडीओ कॉलसमोर प्रेमीयुगुलानं केलं विषप्राशन; प्रेयसीचा मृत्यू, प्रियकर आयसीयूमध्ये!
14
Jalana: कामाहून परतणाऱ्या तीन कष्टकरी मित्रांवर वीज कोसळली; दोघांचा मृत्यू
15
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...
16
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
17
सूरतमध्ये २३ वर्षीय युवतीवर गँगरेप; पोलिसांनी भाजपा पदाधिकाऱ्यासह त्याच्या मित्राला केली अटक
18
Crime: चुलती- पुतण्याचे अनैतिक संबंध, नवरा ठरत होता अडसर, 'असा' काढला काटा!
19
प्लेऑफ्सआधी RCB ची मोठी चाल! रोहित, शुबमनवर भारी पडलेल्या झिम्बाब्वेच्या गड्यावर खेळला डाव
20
सैफुल्लाह खालिदचा खात्मा...आतापर्यंत १५ हून अधिक क्रूर दहशतवाद्यांना 'सीक्रेट किलर'ने मारले

माळीण पुनर्वसनात भिंतींना तडे, रस्ते खचले

By admin | Updated: June 25, 2017 17:56 IST

माळीण पुनर्वसनात पहिल्याच पावसात ठिकठिकाणी भराव खचल्याने भिंतींना तडे गेल्याने रस्ते खचले

ऑनलाइन लोकमतघोडेगाव, दि. 25 - माळीण पुनर्वसनात पहिल्याच पावसात ठिकठिकाणी भराव खचल्याने भिंतींना तडे गेल्याने रस्ते खचले, ड्रेनेज लाईन उखडल्या आणि गटारे छोटी झाल्याने पाणी वाहिले. त्यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, 8-10 कुटुंबे पुन्हा पत्र्याच्या शेडमध्ये राहण्यास जाण्याची मागणी करू लागले आहेत. 30 जुलै 2014 रोजी माळीण गावावर डोंगर कोसळून 44 कुटुंबातील 151 लोक मृत्युमुखी पडले. रात्रभर पडलेल्या पावसामुळे साचलेले पाणी डोंगराला पडलेल्या भेगांमध्ये साचून डोंगराचा कडा कोसळला. यातून नशीबाने बचावलेल्या ग्रामस्थांचे नवीन माळीण वसून कायमस्वरुपी पुनर्वसन करण्यात आले आहे. यातील 67 घरांचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व इतर मान्यवरांच्या हस्ते झाला. परंतु पहिल्याच पावसात या गावाची दयनीय अवस्था झाली आहे. दि. 24 रोजी झालेल्या संततधार पावसाने अनेक घरांचे भराव खचले, रस्त्यांना तडे गेले. भिंतींना तडे गेले, घरांच्या पायऱ्या खचल्या, ड्रेनेजच्या पाईपलाईन उखडल्या आहेत. गटारांचे चेंबर खचले आहेत. तसेच अंगणवाडीजवळील मोठी भिंत तुटल्याने शाळेला मोठा धोका निर्माण झाला आहे. शाळेमागील भराव वाहून आल्यामुळे व बाजूच्या भिंतीला तडे गेल्याने तेथे शाळा भरविता येणार नाही. या परिस्थितीमुळे ग्रामस्थांमध्ये भीती निर्माण झाली आहे. या आरसीसी भिंती घरांवर पडल्या तर गावावर मोठे संकट येऊ शकते. यासाठी काही लोक पुन्हा पत्र्याच्या शेडमध्ये राहायला जायची मागणी करू लागले आहेत. सुमारे 8-10 कुटुंबांनी तेथून बाहेर पडण्याची तयारी सुरू केली आहे. दरम्यान, ही परिस्थिती समजल्यानंतर तहसीलदार रवींद्र सबनीस, नायब तहसीलदार विजय केंगले यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. शाळेजवळ राहणाऱ्या लोकांची पत्रा शेडमध्ये राहायची व्यवस्था करावी तसेच शाळा देखील पुन्हा जुन्या जागेच भरवली जावी. पावसाळा संपल्यानंतर कामे पुर्ण करून शाळा भरावी. सदर काम सुरू असतानाच अनेक त्रुटी निदर्शनात आणून दिल्या होत्या असे माजी सरपंच दिगंबर भालचीम यांनी सांगितले.