शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

कुंपणच ‘वन’ खातेय!

By admin | Updated: July 3, 2017 04:20 IST

एकीकडे राज्यभरात वृक्षलागवडीचे मिशन जोरात सुरू असताना औरंगाबादपासून सुमारे २५ कि.मी. अंतरावर सारोळा जंगलात मोठ्या

गजानन दिवाण/ लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : एकीकडे राज्यभरात वृक्षलागवडीचे मिशन जोरात सुरू असताना औरंगाबादपासून सुमारे २५ कि.मी. अंतरावर सारोळा जंगलात मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होत असल्याचा धक्कादायक प्रकार रविवारी सकाळी उघडकीस आला. साधारण दहा ट्रॅक्टर झुडपी जंगल साफ केलेले आढळल्याने वनप्रेमींमध्ये खळबळ उडाली आहे. मार्च महिन्यात पांढऱ्या टोपीचा भारीट अर्थात व्हाइट कॅप्ड बंटिंग या देखण्या पक्ष्याचे दर्शन झालेला हाच परिसर. साधारण १६० पेक्षा जास्त पक्ष्यांच्या प्रजाती या परिसरात आढळतात. बाभूळ, करवंद आणि आमटी हे झुडपी वृक्ष येथे मोठ्या प्रमाणात आढळतात. एकीकडे राज्यभरात वृक्षलागवड मोहीम जोरात सुरू असताना आणि त्याचे तेवढेच कौतुक होत असताना सारोळा जंगलात मात्र गेल्या दोन दिवसांपासून वृक्षलागवडीचाच मुहूर्त शोधून मोठी वृक्षतोड केली जात आहे. रविवारी सकाळी पक्षीमित्र पंकज शक्करवार, रूपाली शक्करवार आणि अश्विनी मोहरीर या परिसरात गेले असता हा धक्कादायक प्रकार समोर आला.रस्त्याच्या बाजूला लावण्यात आलेल्या झाडांना कुंपण करण्यासाठी झाडांची ही कत्तल केली जात आहे. बाभूळ, करवंद आणि आमटीचे हे झुडपी जंगल साफ केले जात असल्याचे पंकज शक्क्रवार यांनी ‘लोकमत’ला सांगितले.पक्ष्यांचा जीव धोक्यातबटेर, तितर आणि मोर यांसारख्या पक्ष्यांसाठी हा परिसर ओळखला जातो. हे जंगल साफ करून परिसरात आढळणाऱ्या १६० वर पक्ष्यांच्या प्रजातींचा अधिवास धोक्यात आणला जात असल्याची प्रतिक्रिया पक्षीमित्र पंकज शक्करवार यांनी दिली.म्हणे, कुंपण घालत आहोत!औरंगाबादचे रेंज फॉरेस्ट आॅफिसर शशिकांत तांबे रविवारी औरंगाबादेतील मिलिट्री परिसरात वृक्षारोपण मोहिमेत व्यस्त होते. या वृक्षतोडीबाबत ते म्हणाले, सारोळा जंगल परिसरातील रस्त्याच्या बाजूला गेल्यावर्षी साधारण १२०० झाडे लावण्यात आली होती. त्या झाडांना गेल्या दोन दिवसांपासून कुंपण घातले जात आहे. यासाठी वाळलेली झाडे तोडली जात असल्याचे त्यांनी सांगितले.