शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

महिलांमध्ये घबराट पसरविणारे कृत्य

By admin | Updated: May 10, 2017 01:53 IST

नयना पुजारी यांचा खून नोकरदार महिलांमध्ये घबराट पसरविणारा असून ही घटना दुर्मिळातील दुर्मीळ आहे, असे विशेष सरकारी

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : नयना पुजारी यांचा खून नोकरदार महिलांमध्ये घबराट पसरविणारा असून ही घटना दुर्मिळातील दुर्मीळ आहे, असे विशेष सरकारी वकील हर्षद निंबाळकर यांनी न्यायालयात युक्तिवाद करताना सांगितले.आरोपींनी घटनेच्या दिवशी नयना यांना बसस्टॉपवर उभ्या असताना कारमध्ये घेतले. सुरक्षित स्थळी सोडणे अपेक्षित होते, मात्र त्यांचे अपहरण केले. त्यांना विवस्त्र केले. पाच तास विवस्त्र अवस्थेत कारमधून फिरवले. त्या मदतीसाठी रडत होत्या, त्यांची काय अवस्था झाली असेल? आरोपींनी नयना यांच्यावर तीन वेळा बलात्कार केला. त्या मदतीसाठी याचना करत असताना आरोपी तो प्रकार एन्जॉय करत होते, याकडेही त्यांनी न्यायालयाचे लक्ष वेधले.निंबाळकर म्हणाले, आरोपींनी केलेले कृत्य अमानवीय व राक्षसी आहे. केलेले कृत्य उघडकीस येऊ नये म्हणून त्यांनी ओढणीने त्यांचा गळा आवळला. चेहऱ्यावर दगड टाकून चेहरा विद्रुप केला. आरोपींनी असाह्य महिलेवर अत्याचार केला. या खटल्याची न्यायालयात सुनावणी सुरु असताना राऊत पळून गेला. त्याला पुन्हा पकडल्यानंतर सहा वर्षे शिक्षा सुनावण्यात आली. आरोपींना केलेल्या कृत्याचा त्यांना कोणताही पश्चाताप नाही.सध्या चाळीस टक्क्यांहून अधिक महिला काम करतात. आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांचे प्रमाण ५० टक्के आहे. आरोपींनी केलेले कृत्य महिलांच्या सुरक्षेला धक्का पोहचाविणारे आहे. या प्रकरणाचा जितका परिणाम कुटुंबियांवर झाला, तितकाच नोकरदार महिलांवरही झाला आहे, असेही त्यांनी न्यायालयाला सांगितले.माफीच्या साक्षीदारालाही शिक्षा व्हावी : योगेश राऊत‘मी गुन्हा केला नाही. माफीचा साक्षीदार बनलेल्या राजेश चौधरी याने आणि त्याच्या दोन मित्रांनी हा गुन्हा केला आहे. चौधरी माझी गाडी घेऊन गेला होता. माझ्याबरोबर माफीचा साक्षीदार चौधरी यालाही शिक्षा द्यावी. बायको, मुलगी आणि आई असे माझे कुटुंब आहे. याचा विचार करून मला दया दाखवावी. कमीत कमी शिक्षा सुनवावी,’ अशी विनवणी मुख्य आरोपी योगेश राऊत याने न्यायालयास केली.शिक्षेवर काय बोलायचे आहे का, अशी विचारणा न्यायालयाने तिघांना केली. त्यावेळी आपण हा गुन्हा केला नसल्याचे राऊत याने सांगितले. महेश ठाकूर याने, न्यायालय देईल ती शिक्षा मान्य असल्याचे सांगितले. तर विश्वास कदम म्हणाला, ‘‘न्यायालयात आरोपींना शिक्षा होत असल्याचे ऐकले होते. मात्र, ज्याच्या गुन्हयाशी काहीही संबंध नसतानाही शिक्षा होत असल्याची प्रचिती आज येत आहे. माझा या गुन्ह्याशी काहीही संबंध नाही. पोलिसांनी मला या प्रकरणात गोवले आहे.’’