शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

महिला आमदार सरसावल्या

By admin | Updated: March 20, 2017 03:11 IST

वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार शनिवारी विधानसभेत अर्थसंकल्प सादर करत असताना, विरोधकांनी गोंधळ घालून वारंवार त्यांच्या भाषणात अडथळे आणण्याचा प्रयत्न केला

अतुल कुलकर्णी / मुंबईवित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार शनिवारी विधानसभेत अर्थसंकल्प सादर करत असताना, विरोधकांनी गोंधळ घालून वारंवार त्यांच्या भाषणात अडथळे आणण्याचा प्रयत्न केला, पण विरोधकांच्या घोषणाबाजीला न जुमानता मुनगंटीवारांनी तब्बल दोन तास आपले घोडे नेटाने दामटले. विशेष म्हणजे, दोन्ही काँग्रेसच्या महिला सदस्यांनी वेलमध्ये उतरून जोरदार घोषणाबाजी केली.राष्ट्रवादीचे दिवंगत नेते आर. आर. पाटील यांच्या पत्नी सुमनताई पाटील पहिल्यांदा वेलमध्ये उतरल्या. ते पाहून काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यादेखील सरकारविरोधी घोषणा देत वेलमध्ये उतरल्या, तर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या पत्नी अमिता चव्हाण यांनी गळ्यात अडकवलेला टाळ वाजवून त्यांना प्रोत्साहन दिले. त्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आमदारांमध्ये उत्साह संचारला. गंगाखेडचे राष्ट्रवादीचे आ. मधुसुदन केंद्रे हे वित्तमंत्र्यांच्या प्रत्येक घोषणेगणिस ‘गाजर दिलं...गाजर दिलं..!’ म्हणत होते.अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांना उद्देशून तुम्ही जरा खाली बसा, तुमचे पाय दुखत असतील, असा सल्ला दिला, तेव्हा पृथ्वीराज चव्हाण लगेच उठून उभे राहिले. बजेटचे भाषण संपेपर्यंत पूर्ण दोन तास माजी उपमुख्यमंत्री अजित पवार सभागृहात उभे होते, तर पतंगराव कदम यांची सतत उठबस सुरू होती. कोकणी लोक ‘व्हय महाराजा’ म्हणत ग्रामदेवतेला गाऱ्हाणे घालतात, तसे भास्कर जाधव कर्जमाफी करा, अशा घोषणा द्यायचे आणि बाकी सदस्य ‘व्हय महाराजाऽऽऽ!’ म्हणत त्यांच्या मागे ओरडायचे. वित्तमंत्र्यांनी देशी विदेशी मद्यावरील करांच्या संबंधी मजकूर वाचत असतानाच विरोधकांच्या घोषणा थंडावल्या. नेमकी तीच वेळ साधत अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी, ‘बघा, हा विषय विरोधक शांतपणे ऐकत आहेत,’ असा जोरदार चिमटा काढला आणि मुख्यमंत्री, वित्तमंत्र्यांसह सारे सभागृह हास्यात डुंबून गेले, पण दुसऱ्याच क्षणी विरोधकांनी घोषणांचा जयघोष चालू ठेवला.काँग्रेसचे गटनेते विजय वडेट्टीवार, रणजित कांबळे अर्थसंकल्प सुरू झाल्यानंतर, १० मिनिटे उशिराने सभागृहात आले, तर कालीदास कोळंबकर बराच वेळ स्वत:च्या जागेवर बसून होते. मंत्री महादेव जानकरांनी घोषणा देणाऱ्या आ. अब्दुल्ल सत्तार यांना स्वत:जवळ बोलावून घेतले आणि बराच वेळ बसवून ठेवले. एमआयएमचे आमदार विरोधकांच्या घोषणाबाजीत सहभागी झाले नाहीत.