शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

आर्थिक व्यवहारातून महिलेला मारहाण

By admin | Updated: June 28, 2016 02:25 IST

व्यावसायिक गाळा भाड्याने घेण्यावरुन महिलेला शिवीगाळ करत मारहाण झाल्याचा प्रकार खैरणेत घडला आहे.

नवी मुंबई : व्यावसायिक गाळा भाड्याने घेण्यावरुन महिलेला शिवीगाळ करत मारहाण झाल्याचा प्रकार खैरणेत घडला आहे. याप्रकरणी रिजवान पटेल याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पटेलवर यापूर्वी देखील गंभीर गुन्हे दाखल असल्याने त्याच्यावर तडीपारीच्या कारवाईला पोलिसांनी सुरवात केली आहे.वाशीत राहणाऱ्या महिलेने रिजवान पटेलकडून व्यावसायिक गाळा भाड्याने घेतला होता. याकरिता सदर महिलेने पटेल याला साडेतीन लाख रुपये दिले होते. तीन लाख रुपये भाड्याच्या कराराचे तर ५० हजार रुपये गाळ्यातील उर्वरित कामे पूर्ण करण्याच्या निमित्ताने पटेलने घेतले होते. मात्र पैसे घेतल्यानंतरही त्यांना पटेलकडून कसलाही प्रतिसाद मिळत नव्हता. अखेर त्यांनी दिलेली रक्कम परत मागितली असता पटेलने त्यांना धनादेश दिला. परंतु हा धनादेश न वटल्यामुळे सदर महिलेचे कुटुंब जाब विचारायला गेले होते. यावेळी रिजवान याने गलिच्छ शिवीगाळ करत धक्काबुकी केल्याची तक्रार सदर महिलेने कोपरखैरणे पोलिसांकडे केली आहे.रिजवानवर यापूर्वी देखील अनेक गुन्हे दाखल असून अवैधरीत्या गोमांस विक्री प्रकरणी देखील त्याचा सहभाग आढळून आला होता. त्याच्यावर दाखल असलेल्या अशा अनेक गंभीर गुन्ह्यांची दखल घेत तत्कालीन उपआयुक्त शहाजी उमाप यांनी त्याला तडीपारीच्या कारवाईला सुरवात केली होती. याकरिता त्याला दोनदा कारणे दाखवा नोटीस बजावलेली आहे. त्यापैकी एका नोटीसला त्याने प्रतिसाद दिला असून पोलिसांनी त्याच्या कारणाबाबत असमाधान व्यक्त केलेले आहे. यानुसार विद्यमान उपआयुक्त प्रशांत खैरे यांनी नुकतीच त्याला तिसरी नोटीस बजावली असून लवकरच त्याच्यावर सक्त कारवाईची शक्यता आहे. (प्रतिनिधी)रिजवान याच्याविरोधात पोलिसांकडे येणाऱ्या तक्रारींची दखल घेतली जावू नये व त्याला अभय मिळावे याकरिता पोलिसांवर राजकीय दबाव येत आहे. एका राजकीय व्यक्तीच्या माध्यमातून गृहमंत्रालयातून पोलिसांवर हा दबाव येत असल्याचे सूत्रांकडून समजते. यामुळे नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाशी संबंध नसतानाही केवळ गुन्हेगारांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न करणाऱ्या त्या मंत्र्याविरोधात पोलिसांमध्ये नाराजी पसरली आहे.