शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

फेसबुकवरील राजकीय कॉमेंट्सवरून हाणामारी

By admin | Updated: January 17, 2017 01:37 IST

फेसबुकवर एकमेकांविरुद्ध राजकीय कॉमेंट्स टाकल्यावरून दोन गटांत रविवारी (दि. १५) संध्याकाळी ७ वाजण्याच्या सुमारास मारामारी झाली.

जेजुरी : जेजुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तक्रारवाडी येथे फेसबुकवर एकमेकांविरुद्ध राजकीय कॉमेंट्स टाकल्यावरून दोन गटांत रविवारी (दि. १५) संध्याकाळी ७ वाजण्याच्या सुमारास मारामारी झाली. दोन्ही गटाकडून फिर्यादी नवनाथ रामदास पिलाणे व संतोष धोंडिबा खेंगरे यांनी एकमेकांविरुद्ध मारामारी व महिलांचा विनयभंगाच्या तक्रारी दाखल केल्या आहेत. या तक्रारीवरून जेजुरी पोलिसांनी दोन्ही गटातील १७ जणांवर मारहाण व विनयभंगाचे गुन्हे दाखल केले आहेत. तक्रारवाडी (ता. पुरंदर) येथे रविवारी संध्याकाळी ७ वाजण्याच्या सुमारास फेसबुकवरील कॉमेंट्सवरुन दोन्ही गटात बाचाबाची सुरू झाली. यातून काठ्या व लाथाबुक्क्यांनी एकमेकांना मारहाण करण्यात आली. या वेळी दोन्ही गटातील भांडणे सोडविण्यासाठी महिला आल्या होत्या. त्यांनाही मारहाण झाल्याने दोन्ही गटाने एकमेकांविरुद्ध जेजुरी पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल केल्या. फिर्यादी नवनाथ रामदास पिलाणे यांच्या तक्रारीनुसार सुशील उत्तम खेंगरे, निखिल उत्तम खेंगरे, संतोष धोंडिबा खेंगरे, उत्तम गोपाळ खेंगरे, एकनाथ दत्तात्रय खेंगरे, हृषीकेश नामदेव खेंगरे, सागर मल्हारी खेंगरे, अक्षय मधुकर खेंगरे, ललिता संतोष खेंगरे यांच्या विरोधात मारहाण व विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर दुसऱ्या गटातील फिर्यादी संतोष धोंडिबा खेंगरे यांच्या तक्रारीनुसार नवनाथ रामदास पिलाणे, संगम रामदास पिलाणे, विक्रम लक्ष्मण जगताप, महेश लक्ष्मण जगताप, कमलाकर रामदास व्हलगुडे, सुरेखा रामदास व्हलगुडे, सर्जेराव दत्तात्रय पिलाणे, सागर बबन पिलाणे, यांच्यावर मारामारी व विनयभंगचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एकमेकांना दमदाटी, शिवीगाळ तसेच काठीने मारामारी करून गंभीर स्वरूपाची दुखापत करणे व महिलांचा विनयभंग करणे आदीनुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आरोपींना अटक करून सासवड न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने गुन्ह्याचा तपास होईपर्यंत दोन्ही गटातील आरोपींना जामीन मंजूर केला आहे. (वार्ताहर)