शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्रातही ‘सुकमा’ची भीती

By admin | Updated: April 26, 2017 01:37 IST

माओवाद्यांनी छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यात घडवून आणलेल्या घातपाताची पुनरावृत्ती महाराष्ट्रातही होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

नरेश डोंगरे / नागपूरमाओवाद्यांनी छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यात घडवून आणलेल्या घातपाताची पुनरावृत्ती महाराष्ट्रातही होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. मात्र, सरकार नक्षलींना गांभीर्याने घेत नसल्याचे दिसते. नक्षल्यांनी गेल्या दीड महिन्यात जाळपोळ, हल्ले आणि चकमकीच्या ११ घटना घडवल्या आहेत. ४ महिन्यांत ५ निरपराध नागरिकांची हत्या केली असून, कोणत्याही क्षणी नक्षल्यांकडून गडचिरोली-गोंदियात ‘सुकमा’ची पुनरावृत्ती घडू शकते. मात्र, सरकारी पातळीवर याचे गांभीर्य दिसून येत नाही. महाराष्ट्राच्या नक्षलविरोधी अभियान प्रमुखांसह(एएनओ) अनेक पदे तब्बल अडीच महिन्यांपासून रिक्त आहेत. शिवाय, नक्षलवाद्यांचा बीमोड करण्याची जबाबदारी ज्या एएनओवर आहे, तिथेही दोन डझनपेक्षा जास्त पदे रिक्त आहेत. त्यात चार पोलीस निरीक्षक आणि डझनभर उपनिरीक्षकांचाही समावेश आहे. एएनओ प्रमुखांचे पदही रिक्त आहे. २०१६ मध्ये या पदावर शिवाजीराव बोडखे हे कार्यरत होते. डिसेंबर २०१६ अखेरीस गृहविभागाने या पदावर एस. शेलार यांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला.जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात तशी रीतसर बदली प्रक्रिया झाली. मात्र, शेलार यांनी या बदली आदेशाला धुडकावून लावले. तब्बल महिनाभर वाट बघूनही ते येथे रूजू झाले नाहीत. त्यामुळे बोडखे यांनी ४ फेब्रुवारीला त्यांच्या नव्या जबाबदारीचा पदभार स्वीकारला.