शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

नेरुळमध्ये साथीच्या आजारांची भीती

By admin | Updated: July 20, 2016 02:56 IST

सिडको व पालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने नेरूळ सेक्टर २० मधील बहुमजली इमारतीवर कारवाई केली होती.

नवी मुंबई : सिडको व पालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने नेरूळ सेक्टर २० मधील बहुमजली इमारतीवर कारवाई केली होती. परंतु इमारतीचे अर्धे बांधकाम तसेच ठेवण्यात आले आहे. यामध्ये पाणी साचून साथीचे आजार पसरण्याची शक्यता असून बांधकाम कोसळून अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. बालाजी डोंगराकडे जाणाऱ्या रोडला लागून अनधिकृतपणे पाच मजल्याची इमारत बांधण्यात आली होती. या अतिक्रमणावर सिडको व पालिकेच्या पथकाने जूनमध्ये कारवाई केली होती. वास्तविक अतिक्रमण विभागाने सर्व बांधकाम जमीनदोस्त करून अतिक्रमण झालेला भूखंड मोकळा करणे अपेक्षित असते. बांधकामाचे डेब्रिज इतर सर्व कचरा तेथून हटविणे आवश्यक आहे. परंतु सिडको बहुतांश इमारतींचे बांधकाम अर्धवट पाडून निघून जाते. यामधील काही इमारतींचे बांधकाम पुन्हा केले जात असून बांधकाम करण्यासारखी स्थिती नसेल तर अर्धवट पाडलेली इमारत त्याच ठिकाणी उभी असते. बालाजी टेकडीवरील इमारतही अशाचप्रकारे उभी आहे. पावसाळ्यामध्ये ही इमारत कोसळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मुख्य रोडला लागून हे बांधकाम असल्याने अपघात झाल्यास जीवितहानी होण्याची शक्यता आहे. अतिक्रमण विभागाच्या निष्काळजीपणाचा फटका नागरिकांना बसू लागला आहे. अर्धवट पाडलेल्या इमारतींमध्ये पावसाचे पाणी साचून परिसरात डेंग्यू व मलेरियाची साथ पसरू लागली आहे. दोन्ही प्रशासनाने तत्काळ बांधकाम हटविलेल्या ठिकाणावरून डेब्रिज उचलावे व शिल्लक कारवाईही पूर्ण केली जावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे. पावसाळ्यात जर आजारामुळे कोणाचा मृत्यू झाला किंवा अपघात घडल्यास त्याला पूर्णपणे अतिक्रमण विभाग जबाबदार असेल, असा इशारा रहिवाशांनी दिला आहे. (प्रतिनिधी)