शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

आरेतील कचरा जीवावर बेतण्याची भीती

By admin | Updated: October 3, 2016 02:22 IST

गोरेगावच्या आरे कॉलनीतील काही भागात कचऱ्याचे ढीगच्या ढीग वाढत आहेत.

गौरी टेंबकर-कलगुटकर,

मुंबई- गोरेगावच्या आरे कॉलनीतील काही भागात कचऱ्याचे ढीगच्या ढीग वाढत आहेत. या कचऱ्याच्या ढिगांमुळे परिसरात वावरणाऱ्या कुत्र्यांना आणि डुकरांना खाण्यासाठी लोकवस्तीत बिबट्या शिरण्याची धास्ती वर्तविली जात आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावे, असा इशारा वनविभागाने दिला आहे.आरेच्या आदर्शनगर बसस्टॉप व नागेश्वर मंदिराजवळ मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे ढिग पाहायला मिळत आहेत. गेला महिनाभर या परिसरात कचऱ्याची गाडीच फिरकलेली नाही. परिणामी कचऱ्यात फेकले जाणारे अन्न खाण्यासाठी कुत्र्याच्या टोळ्यांचा वावर मोठ्या प्रमाणात लोकवस्तीत वाढला आहे, अशी माहिती अनुसूचित जमाती विभागाचे अध्यक्ष सुनील कुमरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. त्यामुळे या कुत्र्याच्या तसेच डुकरांच्या स्वरूपात असलेल्या भक्षाच्या शोधात लोकवस्तीत बिबट्या येण्याची दाट शक्यता वनखात्याकडून व्यक्त केली जात असल्याचे ते म्हणाले. रात्रीच्या वेळी या जंगल परिसरात बिबट्या दिसत असल्याचे कुमरे यांनी नमूद केले. त्यातच या ठिकाणी दिवे नसल्याने अंधार असतो. ज्याचा फायदा घेत हा बिबट्या माणसांवर हल्ला करू शकतो, त्यामुळे इथल्या स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.कचऱ्यामुळे या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना दुर्गंधीचा त्रास सहन करत याच कचऱ्यावरुन वाट काढावी लागते. त्यामुळे विशेषकरून शाळकरी मुलांना विविध आजार होण्याची धास्ती देखील स्थानिकांना वाटत आहे. दत्तक वस्ती योजनेतील कर्मचारी घरोघरी कचरा घेण्यास नियमित येत नसल्याने नागरिकानाच कचरा टाकावा लागतो. दत्तक वस्ती योजनेतील कामगार मनमानी कारभार करतात. यामुळे निर्माण होणाऱ्या डेंगू व मलेरियाच्या डासांमुळे अनेक जण आजारी पडले आहेत, ज्यासाठी याठिकाणी कचरा उचलून धुर फवारणी करण्याची मागणी स्थानिक राहिवाशी संतोष चव्हाण यांनी केली आहे. पालिकेच्या पी दक्षिण विभागाकडून याबाबत कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. मात्र ते लवकर पूर्ण करण्याची विनंती स्थानिकांकडून केले जात आहे.>परिसरात चार बिबट्यांचा वावरमतईपाडा, खांबाचा पाडा याठिकाणी नर आणि मादी तर एस आरपीएफ कॅम्पच्या स्विमींग पुलमध्ये देखील नर मादी असे चार बिबटे आरे परिसरात वावरतात. या परिसरात कचरा जमा होत असल्याने तो खाण्यासाठी कुत्रे आणि डुक्कर याठिकाणी येतात. जे बिबटयाचे भक्ष असल्याने त्यांचा पाठलाग करत त्यांना खाण्यासाठी बिबट्या याठिकाणी येतो. पावसानंतर तर सर्वत्र जंगल वाढल्याने तो मोकाट फिरतो. त्यामुळे आमचे रात्रपाळी पथक सतत या परिसरात गस्त घालत असते. त्यामुळे याठिकाणी कचरा जमा होणे हे स्थानिकांच्या जीवावर बेतू शकते.-कुंडलीक बुरुटे, वनरक्षक, आरे कॉलनी