शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
6
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
7
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
8
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
9
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
10
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
11
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
12
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
13
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
14
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
15
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
16
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
17
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
18
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
19
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
20
Latest Marathi News LIVE: डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

गतिरोधकामुळेच अपघाताची भीती

By admin | Updated: June 9, 2016 02:12 IST

सुधा नदीवरील पुलावर प्रवेश करताना टाकण्यात आलेले दोन्ही बाजूंचे गतिरोधक वाहनचालकांना लांबून दिसत नाहीत.

देहूगाव : तळेगाव-चाकण रस्त्यावरील सुधा नदीवरील पुलावर प्रवेश करताना टाकण्यात आलेले दोन्ही बाजूंचे गतिरोधक वाहनचालकांना लांबून दिसत नाहीत. त्यामुळे वेग कमी केला न गेल्याने वाहने गतिरोधकावरून उंच उडतात. त्यामुळे चालकांचा वाहनांवरील ताबा सुटून अपघात होण्याची शक्यता असल्याने हे गतिरोधक अत्यंत धोकादायक बनले आहेत. अपघात टाळण्यासाठी टाकण्यात आलेले गतिरोधक हेच अपघातास कारणीभूत होऊ शकतात. अशा गतिरोधकांवर तातडीने परावर्तक बसवावेत, अथवा पांढरे पट्टे मारण्यात यावेत, अशी मागणी येथील उपसरपंच बाळासाहेब गाडे यांनी केली आहे. सुधा नदीवर तळेगाव व चाकणकडून एकेरी वाहतूक करणारे दोन स्वतंत्र पूल आहेत. यापैकी एक स्वातंत्र्यपूर्व काळातील आहे. त्यालाच लागून नवा पूल अलीकडेच बांधण्यात आला आहे. हे पूल खोलगट व वळणावर असल्याने तळेगाव व चाकणच्या बाजूने येणाऱ्या वाहनचालकांना हा पूल लवकर दिसत नाही. दोन्ही बाजूला तीव्र उतारही आहेत. त्यामुळे चालकांना पुला व वळणाचा अंदाज येत नाही. परिणामी, येथे वारंवार अपघात होतात. अपघात टाळण्यासाठी पुलाच्या सुरुवातीलाच वाहनांची गती कमी करण्यासाठी व तळेगाव व चाकणच्या मार्गावर मोठे गतिरोधक टाकण्यात आले आहेत. ते उंच व मोठे तर आहेत. त्यावर कोणताही परावर्तक किंवा पांढरे पट्टे लावलेले नसल्याने वाहनचालकांना हे गतिरोधक रात्रीच नाही, तर दिवसाही लवकर दिसत नाहीत. (वार्ताहर) >गतिरोधक दिसत नसल्याने वाहनांचा वेग कमी होत नाही किंवा वाहनचालकांना वाहनांचा गतिरोधक दिसल्यानंतर वेग कमी करण्यास संधी मिळत नाही. वाहने वेगात असल्याने गतिरोधकावर वाहने उंच उडतात. वाहने उंच उडाल्याने वाहनचालकांचा वाहनावरील ताबा सुटून वाहन थेट नदीच्या पात्रात जाऊन मोठा अपघात होण्याची शक्यता आहे किंवा वाहनांचे नुकसान होण्याची शक्यता आहे.