शहरं
Join us  
Trending Stories
1
घातपात की आणखी काही? योगी आदित्यनाथांच्या दौऱ्यापूर्वी ५०० किलो स्फोटके सापडली; 20 किमीपर्यंत पेरली...
2
गोव्यात चाललेय काय? आरोग्य मंत्र्यांकडून सीएमओचे काल निलंबन, आज मुख्यमंत्र्यांनी केले रद्द
3
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  
4
Maharashtra Politics : "भाजप आणि निवडणूक आयोगाची मॅच फिक्सिंग...", नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार
5
पाकिस्तान पुन्हा उघडा पडला! सॅटेलाईट फोटो सोबत छेडछाड केली, खोटे दावे केले
6
बीएसएनएलने आणला ऑपरेशन सिंदूर प्लॅन! रिचार्जची काही रक्कम सैन्याला देणार; ग्राहकांनाही डिस्काऊंट मिळणार...
7
जळगाव: लग्नाच्या वाढदिवसासाठी माहेरावरून आली अन् घरात पाय ठेवताच दिसला पतीचा मृतदेह
8
चांदीचा भाव विक्रमी उच्चांकावर; आठवड्यात ८,४०० रुपयांची वाढ; ३ टक्के जीएसटीसह १,०९,२८३ रुपये
9
Bhushi Dam Incident: पोहण्याच्या मोहाने घेतला जीव, भुशी डॅममध्ये बुडून दोन तरुणांचा मृत्यू
10
इंजिनिअरिंगच्या 'त्या' विद्यार्थिनीचा खून प्रेम प्रकरणातून, पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये काय? मित्राविरुद्ध गुन्हा दाखल
11
सासू-सासरे अन् पतीसह तिनं मुलांनाही सोडलं नाही! कुटुंबाला 'स्लो पॉयझन' देणाऱ्या महिलेची 'अशी' झाली पोलखोल
12
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
13
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
14
मुंबई: मेट्रोमोनियल साईटवर भेट, लग्नाचं स्वप्न दाखवून बलात्कार, पैसेही उकळले; आरोपीला न्यायालयाने काय दिली शिक्षा?
15
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
16
IND vs ENG : इंग्लंडमध्ये पोहचताच टीम इंडियाचा कसून सराव; २२ वर्षांनी हा चेहरा पुन्हा संघासोबत दिसला
17
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
18
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
19
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा

खाबुगिरीसाठी एफडीएचे नवीन दुकान

By admin | Updated: February 9, 2016 01:15 IST

केंद्र शासनाचा कायदा पायदळी तुडवून अन्न व औषधी प्रशासन विभागाने विशेष पथकांची स्थापना करणारा आदेश काढला असून, नवीन दुकानदारीच तयार करण्याचा घाट घातला

- अतुल कुलकर्णी,  मुंबई

केंद्र शासनाचा कायदा पायदळी तुडवून अन्न व औषधी प्रशासन विभागाने विशेष पथकांची स्थापना करणारा आदेश काढला असून, नवीन दुकानदारीच तयार करण्याचा घाट घातला गेला आहे. स्वत:विरुद्ध कुठेही तक्रार आली तर ती स्वत:कडेच मागवून घ्यायची, त्याचा तपासही स्वत:च करायचा आणि त्यावर कारवाईदेखील स्वत:च करायची, असा अफलातून प्रकार एफडीएच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्षात आणला आहे. वाढती महागाई, भेसळ रोखण्याचे प्रयत्न करत असल्याचे दाखवत, भ्रष्ट अधिकाऱ्यांना पाठीशी घालण्यासाठी मोठी लॉबी कार्यरत झाल्याचे मंत्रालयीन सूत्रांचे म्हणणे आहे. एफडीएमध्ये गुप्तवार्ता विभाग स्वतंत्रपणे कार्यरत असताना, त्या विभागात येणारी माहितीदेखील प्रत्यक्ष कार्यवाहीसाठी या पथकांनाच दिली पाहिजे, असेही या आदेशात नमूद करून आयपीएस दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या अधिकारांवरही गदा आणण्याचे काम मंत्रालयात बसलेल्या उपसचिवांनी केले आहे. दक्षता पथकांमधील अधिकाऱ्यांना अतिरिक्त कार्यभार देत, अत्यंत चलाखीने काढण्यात आलेल्या या आदेशामागे सहायक आयुक्त, अन्नसुरक्षा अधिकाऱ्यांची मोठी लॉबी कार्यरत झाली आहे.केंद्राचा कायदा काय सांगतो?फूड अ‍ॅथॉरिटीच्या पूर्व परवानगीने गॅझेटमध्ये अधिसूचनेद्वारे प्रसिद्धी दिल्यानंतरच राज्य सरकारांना असे नियम करता येतात. कोणतेही नियम, अधिकार किंवा कर्तव्ये यांच्याविषयी अन्नसुरक्षा मानकांमध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे. फूड अ‍ॅनॅलिसेसपासून ते तक्रार कशी नोंदवायची इथपर्यंतचे नियम, कायद्यांचा स्पष्ट उल्लेख त्यात आहे. शिवाय केंद्राच्या फूड अ‍ॅथॉरिटीची पूर्वपरवानगी न घेता, असे काहीही करता येत नाही. तरीही असे नियम राज्याच्या एफडीएने तयार केले आहेत, जे पूर्णत: बेकायदेशीर आहेत, असे मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.काय आहे नव्या पथकात?- एफडीएव्हिजीलन्स आॅफिसरची पोस्ट आहे. त्यावर आयपीएस अधिकारी नेमला जातो. त्यांच्याकडे एफडीएमधील अधिकाऱ्यांच्या विरोधात तक्रारी येत असतात. मात्र, नव्या आदेशात गुप्तवार्ता विभागात येणाऱ्या तक्रारी, माहिती देखील प्रत्यक्ष कार्यवाहीसाठी विशेष पथकांकडे पाठवाव्यात, असे म्हटले आहे. शिवाय त्या माहितीच्या आधारे विशेष पथकातील अधिकारी या माहितीच्या अनुषंगाने स्वत: किंवा इतर अधिकाऱ्यांच्या मदतीने कार्यवाही करतील, असेही हा आदेश सांगतो. वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाचे उपसचिव रा.वि. कुलकर्णी यांच्या सहीने हा आदेश काढला आहे.