शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
6
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
7
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
8
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
9
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
10
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
11
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
12
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
13
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
14
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
15
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
16
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
17
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
18
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
19
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
20
Latest Marathi News LIVE: डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

मिनरल वॉटर कंपन्यांना एफडीएने दिला झटका

By admin | Updated: May 23, 2016 02:06 IST

अन्न व औषध प्रशासन विभागाच्या वतीने वर्षभरात विनापरवाना मिनरल वॉटरचे उत्पादन करणाऱ्या १४ कंपन्यांवर छापे टाकून कारवाई करण्यात आली.

पुणे : अन्न व औषध प्रशासन विभागाच्या वतीने वर्षभरात विनापरवाना मिनरल वॉटरचे उत्पादन करणाऱ्या १४ कंपन्यांवर छापे टाकून कारवाई करण्यात आली. तर १९ मिनरल वॉटर कंपन्यांना प्रतिबंधात्मक आदेश बजावण्यात आले आहेत. पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर शुद्ध पाणी असल्याचा देखावा नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या कंपन्यांना हिसका दाखविण्यात आला आहे.अन्न व नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट यांनी रविवारी अन्न व औषध प्रशासनाच्या (एफडीए) कामगिरीचा तिमाही आढावा घेतला. या वेळी सहआयुक्त शशिकांत केंकरे व सहआयुक्त एस. टी. पाटील उपस्थित होते. एफडीएच्या वतीने वर्षभराचा आढावा सादर करण्यात आला. सध्या मिनरल वॉटर कंपन्यांचे मोठे पेव राज्यभर फुटले आहे. बेकायदेशीरपणे बोअर, विहिरीचे पाणी बाटली बंद करून मोठा नफा कमविण्याचे प्रकार सर्रास सुरू आहे. त्यांच्याविरुद्ध अन्न व औषध प्रशासनाने जोरदार मोहीम उघडली आहे. पुणे विभागाच्या वतीने जिल्ह्यातील विनापरवाना मिनरल वॉटरचे उत्पादन करणाऱ्या १४ कंपन्यांवर धाडी टाकून २ लाख ५१ हजार रुपयांचा पाण्याच्या बाटलींचा साठा जप्त केला. त्याचबरोबर विनापरवाना कार्यरत असलेल्या १९ मिनरल वॉटर कंपन्यांना प्रतिबंधात्मक आदेश बजावण्यात आले आहेत. (प्रतिनिधी)एफडीएच्या वतीने मार्च २०१६ अखेरपर्यंत हॉटेल, रेस्टॉरंट व्यावसायिकांना ४५ हजार ९७२ परवाने दिले आहेत. त्याचबरोबर १ लाख ८१ हजार ८३८ प्रमाणपत्र मंजूर केले. परवाना शुल्कापोटी मार्च २०१६ अखेरपर्यंत एकूण ४१ कोटी ८५ लाख ५८ हजार रूपयांचे शुल्क वसूल करण्यात आले आहे. त्याचबरोबर पुणे विभागाच्या वतीने २ हजार ३५८ नमुने तपासणीसाठी घेण्यात आले, त्यापैकी १३३ नमुने असुरक्षित आढळून आले, तर ३४७ नमुने निश्चित केलेल्या निकषाप्रमाणे नव्हते. गुटखा मुक्ती अभियानांतर्गत ४७५ पानटपऱ्यांवर धाडी टाकून ४ कोटी २८ लाख ७४ हजार रूपये किमतीचा साठा वर्षभरात जप्त करण्यात आला. दुधामध्ये भेसळ करणाऱ्या १६ दूध उत्पादकांवर धाडी टाकून ६ लाख रूपयांचा साठा जप्त केला. कृत्रिमरीत्या फळे पिकविणाऱ्या केवळ ४ विक्रेत्यांवर कारवाई करण्यात एफडीएला यश आले. मार्केट यार्ड येथे दोघा घाऊक आंबा विक्रेत्यांकडून आंबे पिकविण्यासाठी कॅल्शियम कार्बाईडचा वापर केला जात असल्याचे आढळून आल्याचे एफडीएच्या अहवालामध्ये नमूद करण्यात आले आहे.