शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

पंढरपुरात 'एफडीए' ची मोठी कारवाई; विनापरवाना बाटलीबंद पाण्याचा व्यवसायिकावर धाड

By appasaheb.patil | Updated: July 16, 2024 15:16 IST

३ हजार पाण्याचे बॉटल केले जप्त

सोलापूर : लेबलदोष, विनापरवाना बाटलीबंद पाण्याचे व्यवसाय करीत असलेल्या एका ड्रिकिंग वॉटर सेंटरवर अन्न व औषध प्रशासनाने अचानक धाड टाकली. या धाडीत ३ हजार पाण्याचे बॉटल जप्त केले आहे. या कारवाईनंतर या पेढीस अन्न सुरक्षा व मानदे कायद्यांतर्गत परवाना मंजूर होईपर्यंत व्यवसाय बंद करण्याचे आदेश दिले आहेत. 

पंढरपुरात सध्या आषाढी वारीचा सोहळा सुरू आहे. आषाढी सोहळ्यात अन्न व औषध प्रशासन अलर्ट असून बनावट खाद्यपदार्थ, दुषित पाण्याचा पुरवठा करणाऱ्या व्यवसायिकांवर कारवाई करण्यात येत आहे. अन्न व औषध प्रशासन, सोलापूर या कार्यालयातील अन्न सुरक्षा अधिकारी डॉ. उमेश भुसे हे पंढरपुरात आषाढी यात्रेच्या अनुषंगाने तपासणी करीत असताना स्मार्ट कंपनीच्या बाटली बंद पाणी बॉटलवर लेबलदोष असल्याचे आढळून आले.

त्यानंतर भुसे हे तात्काळ सदर पाणी बॉटलवर नमूद मे. पृथ्वीराज एंटरप्राइज, मु. पोस्ट. लक्ष्मी दहिवडी (ता. मंगळवेढा, जि. सोलापूर) या कंपनीस भेट दिली. तपासणी वेळी ही पेढी ही विनापरवाना बाटलीबंद पाण्याचे व्यवसाय करीत असल्याचे आढळून आले . त्यानंतर उमेश भुसे यांनी "स्मार्ट" पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटर या अन्न पदार्थांचा नमुना विश्लेषणासाठी घेऊन उर्वरित ३ हजार बॉटल्स विनापरवाना व्यवसाय, लेबलदोषच्या अनुषंगाने जप्त केला. 

दरम्यान, सदरच्या पाणी बॉटलचा नमुना विश्लेषणासाठी अन्न विश्लेकांकडे पाठविण्याचे कामकाज चालु आहे. सदरची कारवाई पुणे विभागाचे सह आयुक्त सुरेश अन्नपुरे, सोलापूर कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त (अन्न) सुनिल जिंतुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी डॉ उमेश भुसे व नमुना सहाय्यक श्रीशैल हिटनळ्ळी यांच्या पथकाने पूर्ण केली.