शहरं
Join us  
Trending Stories
1
"पैसा वळवलेला नाही, बजेटनुसारच तो खर्च केलाय"; लाडकी बहीणवरुन CM फडणवीसांचे स्पष्टीकरण
2
राजा रघुवंशी यांचा मृत्यू, सोनम अजूनही बेपत्ता; मेघालयात हनिमूनसाठी गेलेल्या जोडप्यासोबत नेमकं काय घडलं?
3
क्रिकेटर रिंकू सिंह आणि खासदार प्रिया सरोज यांचा साखरपुडा! दोघांच्या खास लूकची चर्चा; इथं पाहा Pics
4
पुण्यात अंधश्रद्धेचा कळस! झाडातून वाहू लागलं पाणी, लोकांनी पूजा करत घेतले दर्शन; नंतर कळलं की...
5
सावधान! कोरोना हातपाय पसरतोय, देशभरात ६०००हून अधिक रुग्ण; २४ तासांत 'इतक्या' लोकांचा मृत्यू
6
मोदी सरकारने करून दाखवले! ११ वर्षांत भारतातील गरिबी किती घटली? आकडेवारीच समोर आली
7
“कार्यकर्त्यांच्या मनातला निर्णय होईल”; दोन्ही NCP एकत्र येण्यावर सुप्रिया सुळेंचे विधान
8
Viral : मेहुणीला बघून कंट्रोल सुटला, भर स्टेजवरच नवरदेवाने ताल धरला! व्हिडीओ होतोय व्हायरल
9
MS Dhoni च्या गॅरेजमध्ये 100 हून अधिक लक्झरी बाईक्स; किंमत ऐकून बसेल धक्का..!
10
मणिपूरमध्ये पुन्हा गोंधळ! निदर्शकांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला, पोलिसांशी हिंसक संघर्ष
11
“राहुल गांधी असामान्य नेते, भाजपा, मोदींना खोटे बोलण्याचा नोबेल पुरस्कार द्यावा”: संजय राऊत
12
भारत-इंग्लंड कसोटी आधी तेंडुलकर-अँडरसनमुळे वातावरण तापलं! ECB अन् BCCI असा काढणार तोडगा?
13
२३ पानांचं प्रेमपत्र लिहीत पुतण्यानं उचललं टोकाचं पाऊल! म्हणाला "काका आय लव्ह यु, मी तुमच्याशिवाय..."
14
"सध्या अ‍ॅक्शन सिनेमे चालत आहेत, त्यामुळे.."; आमिर खान 'सितारे जमीन पर'साठी चिंताग्रस्त, म्हणाला-
15
पाकिस्तान पुन्हा तोंडावर पडला; UN मध्ये मागितले ४ समित्यांचे अध्यक्षपद, मिळाला 'ठेंगा'
16
“नितेशने जपून बोलावे, भान ठेवायला हवे, आपण महायुतीमध्ये आहोत हे विसरता कामा नये”: निलेश राणे
17
बकरी ईदच्या दिवशीच वृद्धाने दिली स्वतःची कुर्बानी; मशिदीत नमाज अदा केली अन् नंतर...
18
आंतरराष्ट्रीय स्तरावर हात पसरणारा पाकिस्तान भरतोय नेत्यांचे खिसे! सरकारने वाढवला पाचपटींनी पगार
19
मुंबई गोवा महामार्गांवर CNG टँकरची शिक्षकांच्या ट्रॅव्हल्सला धडक; गॅस गळतीमुळे घराने घेतला पेट
20
HDFC बँकेच्या CEO वर कारवाईची मागणी, ₹२५ कोटी घोटाळ्याचा आरोप; जाणून घ्या प्रकरण

एफडी घोटाळा हजार कोटींचा!

By admin | Updated: January 16, 2016 03:17 IST

राज्य शासनाच्या महामंडळांव्यतिरिक्त दलालांच्या टोळीने काही बड्या कंपन्या आणि संस्थांना मुदत ठेव (एफडी) घोटाळ्यात फसविले असून, या घोटाळ्याची व्याप्ती वाढत आहे. किमान १ हजार कोटी

- यदु जोशी,  मुंबईराज्य शासनाच्या महामंडळांव्यतिरिक्त दलालांच्या टोळीने काही बड्या कंपन्या आणि संस्थांना मुदत ठेव (एफडी) घोटाळ्यात फसविले असून, या घोटाळ्याची व्याप्ती वाढत आहे. किमान १ हजार कोटी रुपयांहून अधिकच्या ठेवींतून ३०० कोटी रुपयांचा अपहार झाल्याचे समोर आले आहे. या देशव्यापी घोटाळ्यात बँकांचे अधिकारीही सामील असून, आतापर्यंत १४ जणांना अटक झाली आहे.शासकीय महामंडळाच्या एफडीतील घोटाळ्याचे हे प्रकरण ‘लोकमत’ने १२ जानेवारीच्या अंकात उजेडात आणले होते. त्याची व्याप्ती केवळ महामंडळापुरतीच मर्यादित नसून खासगी कंपन्या, संस्था आणि व्यक्तींनाही जबर आर्थिक फटका बसला आहे. सध्या ६३७ कोटी रुपयांच्या मुदत ठेवींची माहिती समोर आली असली तरी मुंबई, दिल्लीत याव्यतिरिक्त काही प्रकरणांत आणखी ३५० कोटी रुपयांची गुंतवणूक झाल्याचे म्हटले जाते.रक्कम बुडाल्यात जमा!आतापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार, कंपन्यांनी मुदत ठेवींमध्ये जे ६३७ कोटी ५० लाख रुपये गुंतवले. त्यातील २०१ कोटी रुपये ओव्हरड्राफ्टच्या स्वरूपात दलालांनी अन्यत्र वळते केल्याचा मुंबई पोलिसांचा कयास असून, ही रक्कम नेमकी गेली कुठे, याचा तपास केला जात आहे. त्यामुळे हे (पान ६ वर)असा झाला घोटाळाविविध महामंडळाच्या व खासगी कंपन्यांच्या अधिकाऱ्यांना दलालामार्फत आकर्षक ठेवींचे आमिष दाखवून त्यांच्याकडील रक्कम बँकांमध्ये मुदत ठेवींच्या स्वरूपात गुंतवली गेली. एफडीच्या बनावट पावत्या तयार करून कंपन्यांना दिल्या गेल्या. मूळ पावत्यांवर कंपन्यांचे सही, शिक्के वापरून भलत्याच लोकांची नावे टाकली गेली. बँकांचे ओव्हरड्राफ्ट अकाउंट (ओडी अकाउंट) त्याच बँकेत काढले आणि त्यावर बाहेरील खासगी व्यक्तींना ओव्हर ड्राफ्ट सुविधा मिळवून दिली गेली. या व्यवहारात कोट्यवधी रुपये गिळंकृत करण्यात आले असून, बँक अधिकाऱ्यांच्या संगनमताने, काही कंपन्या, संस्थांच्या पदाधिकाऱ्यांना हाताशी धरून कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणारे रॅकेट वर्षानुवर्षे चालले होते. मुख्य सूत्रधार गजाआडमुख्य सूत्रधार मोहम्मद फसिउद्दिन, विमल बारोट, धनलक्ष्मी बँकेची शाखा व्यवस्थापक अमृता मॅथ्यूज, अनुपम ठाकूर, बँकांचे वित्तीय सल्लागार वा प्रतिनिधी असल्याचा बनाव करणारे अनिल पवार, रॉय जोसेफ थॉमस, अविनाश खंडाळे आणि बँक आॅफ इंडियाच्या कळंबोली शाखा व्यवस्थापक प्रभाकर डिंगणकर सध्या गजाआड आहेत.