शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

तरुणीवर फौजदाराने केला अतिप्रसंगाचा प्रयत्न

By admin | Updated: July 26, 2016 00:40 IST

बलात्काराची तक्रार द्यायला गेलेल्या तरुणीवर एका फौजदाराने (एएसआय) अतिप्रसंगाचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना उपराजधानीत घडली. अवघ्या पोलीस

नागपूर : बलात्काराची तक्रार द्यायला गेलेल्या तरुणीवर एका फौजदाराने (एएसआय) अतिप्रसंगाचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना उपराजधानीत घडली. अवघ्या पोलीस दलासाठी लज्जास्पद ठरलेले हे प्रकरण एका महिला सामाजिक कार्यकर्त्यामुळे तब्बल दहा दिवसानंतर थेट पोलीस आयुक्तांकडे गेले. त्याची तातडीने दखल घेत आयुक्तांनी याप्रकरणी दोषींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्यामुळे अवघ्या पोलीस दलात खळबळ निर्माण झाली आहे.मूळची चंद्रपूर जिल्ह्यातील ही तरुणी सध्या नागपुरात राहते. गिट्टीखदानमध्ये राहून शिकणाऱ्या एका पोलीस पुत्राने प्रेमप्रकरणातून आपल्याशी शरीरसंबंध जोडले आणि नंतर दगाबाजी केली, असा आरोप करीत ती २९ जूनला गिट्टीखदान ठाण्यात तक्रार नोंदवायला गेली. तेथे दुसऱ्या दिवशी तिची तक्रार नोंदवून घेण्यात आली. मात्र, तिचे समाधान झाले नाही. त्यामुळे ती १६ जुलैला दुसरी एक तक्रार घेऊन पोलीस आयुक्तालयात पोहोचली. यावेळी आयुक्तालयात अधिकाऱ्यांची बैठक सुरू असल्याने ती आतमध्ये प्रतीक्षालयात बसली. त्यावेळी तेथे एक पोलीस कर्मचारी होता. त्याने स्वत:चे नाव पटेल सांगितले. तिची विचारपूस केल्यानंतर येथे तक्रार देण्याऐवजी पोलीस उपायुक्तालयात तक्रार नोंदव, असा सल्ला दिला. आपण तिकडेच चाललो, तू माझ्यासोबत चलू शकते, असे सांगत त्याने तिला दुचाकीवर बसवले. मात्र, पोलीस उपायुक्तांच्या कार्यालयात जाण्याऐवजी त्याने तिला आपल्या घराकडे नेले. त्याने तिच्या गालाला हात लावताच त्याचे कलुषित मनसुबे तिच्या लक्षात आले. त्यामुळे तिने तेथून पळ काढला.दरम्यान, हा प्रकार तरुणीने राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला अध्यक्ष नूतन रेवतकर यांना सांगितला. रेवतकर यांनी तिला सोमवारी सायंकाळी पोलीस आयुक्त शारदा प्रसाद यादव यांच्याकडे नेले. आयुक्तांनी पीडित तरुणीची तक्रार ऐकून घेतल्यानंतर परिमंडळ २ च्या उपायुक्तांना कारवाईचे आदेश दिले. कारवाईचे चक्र जोरात एवढेच नव्हे तर सदरचे ठाणेदार मनोज सिडाम यांना या प्रकरणात तातडीने दोषी पोलीस कर्मचाऱ्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले. थेट आयुक्तांनीच आदेश दिल्याने चौकशीची चक्रे वेगात फिरली. सदर पोलीस ठाण्यात सोमवारी रात्री १० च्या सुमारास पीडित तरुणीची तक्रार नोंदवणे सुरू झाले. तिकडे ह्यत्याह्ण पोलीस कर्मचाऱ्याची शोधाशोध सुरू झाली. त्याचे नाव पटेल नसून अल्ताफ आहे. तो कळमना ठाण्यात कार्यरत असल्याचेही स्पष्ट झाले. त्याच्याविरुद्ध वृत्त लिहिस्तोवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.