शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

फौजदाराने केली तक्रारदार तरूणाला बेदम मारहाण

By admin | Updated: June 10, 2014 00:56 IST

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केल्याच्या रागातून ट्रॉम्बे पोलीस ठाण्यातील गणेश अडसुळ या फौजदाराने अमोल अवघडे या १९वर्षीय तरूणाला मारहाण केली.

मुंबई: लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केल्याच्या रागातून ट्रॉम्बे पोलीस ठाण्यातील गणेश अडसुळ या फौजदाराने अमोल अवघडे या १९वर्षीय तरूणाला मारहाण केली. विशेष म्हणजे मारहाणीचा प्रकार पोलीस ठाण्यातच घडला. याप्रकरणी एसीबीने लाच मागितल्याबददल अडसूळला बेडया ठोकल्या आहेत. तसेच मारहाण केल्याप्रकरणी ट्रॉम्बे पोलीस ठाण्यातही त्याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.मानखुर्दच्या महाराष्ट्र नगरात राहणार्‍या अमोलला बलात्काराच्या गुन्हयान्वये ट्रॉम्बे पोलिसांनी अटक केली होती. सध्या तो जामीनावर आहे. या गुन्हयाचा तपास अडसूळ करत होता. अडसूळने या गुन्हयात तुझ्या काकाचाही सहभाग आहे, त्यालाही अटक होऊ शकते, असे सांगून घाबरवले. तसेच काकाची अटक टाळण्यासाठी, या प्रकरणात लवकरात लवकर आरोपपत्र दाखल करण्यासाठी अमोलकडे १५ हजार रूपयांची मागणी केली. मात्र अमोलने लाच न देता अडसूळची तक्रार एसीबीकडे केली. एसीबीने प्रथम या तक्रारीतील तत्थ्यता पडताळून पाहिली. त्यात अडसूळने लाच मागितल्याचे स्पष्ट होताच त्याच्याविरेाधात गुन्हा नोंदविण्यात आला. तसेच अडसूळला पकडण्यासाठी सापळाही रचण्यात आला. मात्र हा सापळा फसला आणि अडसूळ त्यातून निसटला. दरम्यान, हा सापळा अमोलच्या तक्रारीवरून रचण्यात आल्याचे समजताच अडसूळ भडकला. अमोल नेहमीप्रमाणे काल ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात हजेरीसाठी आला तेव्हा अडसूळने त्याला अडवले. पोलीस ठाण्यातील तडीपार विभागात नेऊन त्याला लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. अडसूळच्या मारहाणीत अमोल गंभीर जखमी झाला. ही बाब त्याच्या कुटुंबियांना समजली. ते पोलीस ठाण्यात आले. त्यांनी हुज्जत घालून अमोलला अडसूळच्या तावडीतून सोडविले आणि सायन रूग्णालयात दाखल केले. या घटनेनंतर कुटुंबियांना तक्रारीवरून ट्रॉम्बे पोलीस ठाण्यातच अडसूळविरोधात मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला. तत्पुर्वी एसीबीने अडसूळला लाच मागितल्याबददल अटक केली.