शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
4
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
5
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
6
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
7
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
8
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
9
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
10
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
11
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
12
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
13
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
14
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
15
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
16
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
17
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
18
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
19
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या
20
बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरी बाप्पाचे आगमन, पाहा खास PHOTOS

वडिलांचे अनोखे दातृत्व

By admin | Updated: November 10, 2014 01:07 IST

होळीचा आनंदाचा सण. त्याच दिवशी तो मोटारसायकलवरून खाली पडला. डोक्याला जबर मार लागला. त्याला लागलीच इस्पितळात भरती केले. सात दिवस त्याच्यावर उपचार सुरू होते.

मुलाचे अवयव केले दान : दोघांना मिळाले जीवनदान तर दोघांना दृष्टीनागपूर : होळीचा आनंदाचा सण. त्याच दिवशी तो मोटारसायकलवरून खाली पडला. डोक्याला जबर मार लागला. त्याला लागलीच इस्पितळात भरती केले. सात दिवस त्याच्यावर उपचार सुरू होते. मुलगा बरा होईल, या आशेवर आईवडिल होते. परंतु आठव्या दिवशी डॉक्टरांनी ‘ब्रेनडेड’ घोषित केले. आईचा आक्रोश थांबत नव्हता. वडिलांचाही धीर खचला होता, पण आपला मुलगा जिवंत आहे, ही जाणीव त्यांना सातत्याने होत होती. स्वत:ला सावरत एक निर्णय घेतला, आपल्या मुलाचे अस्तित्त्व कायम ठेवण्याचा तो निर्णय होता. पत्नीची समजूत काढली. डोळे, किडनी दान केले. त्यांच्या या निर्णयामुळे दोघांना जीवनदान तर दोघांना नवी दृष्टी मिळाली. एअर डिफेन्स रेजिमेंटचे निवृत्त हवालदार संजयकुमार सिंग त्या वडिलाचे नाव. त्यांच्या या अनोख्या दातृत्वाचा सत्कार जिल्हा माजी सैनिक कल्याण अधिकारी कार्यालयाच्यावतीने रविवारी ११८ बटालियन आर्मी येथे करण्यात आला. यावेळी त्यांची पत्नी आरती सिंग उपस्थित होत्या.संजयकुमार आणि आरती सिंग यांचा १८ वर्षीय मुलगा अमित हा २७ मार्च २०१३ होळीच्या दिवशी मित्रांना भेटायला मोटारसायकलने निघाला. मात्र, काही वेळातच तो रस्त्यावर पडून असल्याचा निरोप आला. त्याला लागलीच जवळच्या इस्पितळात आणि नंतर छिंदवाडा जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. प्रकृती गंभीर असल्याने आणि डोक्याला जबर मार लागल्याने तेथून त्याला नागपुरातील एका खासगी इस्पितळात हलविण्यात आले.संघर्ष संपला पण संयम नाही नागपूर : अचानक झालेल्या या घटनेने सर्वच हादरून गेले होते. बेशुद्ध अवस्थेत अमितवर सात दिवस उपचार चालले. तो बरा होईल या आशेवर आईवडिल होते. परंतु आठव्या दिवशी डॉक्टरांनी मेंदूत रक्तस्राव झाल्याचे सांगून ब्रेनडेड घोषित केले. त्याच्या सर्व अवयवांचे कार्य सुरू होते. व्हेंटिलेटरवर आणखी काही दिवस ठेवून पाहता येईल, असेही डॉक्टरांचे म्हणणे होते. या धक्क्यातून सावरत वडिलांनी खचून न जानता संयमाने अवयवदानाचा निर्णय घेतला. मात्र, हा निर्णय अमितच्या आईला सांगतांना त्यांना मनाची खूप तयारी करावी लागली. पण ती माताही समजली. मुलाची किडनी, डोळे या अवयवाचे दान करायास तिने होकार दिला. या निर्णयाने त्या दाम्पत्याने एक नवीन आदर्श समाजासमोर ठेवला. दुसऱ्याच दिवशी अमितची किडनी अत्यंत गरजू असलेल्या एका २० वर्षीय मुस्लिम मुलीला आणि एका पोलिसाला देण्यात आली तर इतर दोघांना नेत्रदान करून त्यांना नवी दृष्टी दिली. त्यांच्या या कार्याची प्रेरणा इतरांना मिळावी म्हणून जिल्हा माजी सैनिक कल्याण अधिकारी कार्यालयाच्यावतीने आयोजित माजी सैनिकांच्या मेळाव्यात मोहन फाऊंडेशनच्या सहकार्याने या दाम्पत्याचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हा माजी सैनिक कल्याण अधिकारी कार्यालयाचे लखन पांडे, कर्नल राजेश, सीओ यश राठोड व मोहन फाऊंडेशनचे नागपूरचे संचालक डॉ. रवि वानखेडे उपस्थित होते. ‘माझा मुलगा अमित आजही अवयव रूपात जिवंत आहे’, संजयकुमार सिंग यांच्या या वाक्याने उपस्थित सर्व माजी सैनिकांनी टाळ्या वाजवून स्वागत केले. त्यावेळी त्या दोघांच्या डोळ्यात अश्रू होते.