शहरं
Join us  
Trending Stories
1
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
2
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
3
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
4
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
5
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
6
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
7
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
8
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
9
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
10
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
11
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
12
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
13
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
14
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
15
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
16
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
17
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
18
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
19
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
20
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
Daily Top 2Weekly Top 5

पित्याची आत्महत्या

By admin | Updated: September 8, 2016 05:48 IST

नात्यातील टवाळखोर तरुणांकडून मुलीच्या सतत होणाऱ्या छेडछाडीमुळे व्यथित झालेल्या पित्याने विषप्राशन केल्याची घटना कर्जत तालुक्यातील बाभूळगाव येथे घडली.

मिरजगाव (अहमदनगर) : नात्यातील टवाळखोर तरुणांकडून मुलीच्या सतत होणाऱ्या छेडछाडीमुळे व्यथित झालेल्या पित्याने विषप्राशन केल्याची घटना कर्जत तालुक्यातील बाभूळगाव येथे घडली. पोपट मारुती पुराण (४१) असे या पित्याचे नाव असून, उपचारांदरम्यान मंगळवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला.२१ आॅगस्टला हरिनाम सप्ताहानिमित्त पोपट काल्याचे कीर्तन ऐकण्यासाठी पत्नीसोबत गावात गेले होते. मिरजगावच्या शाळेत दहावीत शिकणारी त्यांची मुलगी घरी एकटीच होती. याचा फायदा घेत आरोपी केतन भाऊसाहेब लाढाणे याने घरात घुसून तिच्याशी लज्जास्पद वर्तन केले. त्यामुळे घाबरलेल्या मुलीने वस्तीपासून दोन किलोमीटर अंतरावरील गावात पळत येऊन कीर्तनात दंग असलेल्या आईवडिलांना हा प्रकार सांगितला. त्यानंतर, आईने याबाबत मिरजगाव पोलीस दूरक्षेत्रात तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपी व त्याचा मित्र या दोघांना अटक केली. दुसऱ्या दिवशी गावातील प्रतिष्ठितांच्या मध्यस्थीने व आरोपी नातेवाईक असल्याने मुलीच्या आईने तक्रार मागे घेतली. त्याचदिवशी त्या दोघांना समज देऊन सोडण्यात आले. मात्र, आरोपीने त्यानंतरही मुलीची छेड काढणे सुरूच ठेवले. स्वभावाने गरीब असलेल्या पोपट यांनी आरोपीच्या आजोबाला हा प्रकार सांगितला. मात्र, त्यांचीही आरोपीला साथ असल्याचे लक्षात आल्यानंतर, हताश झालेल्या पोपट यांनी शुक्रवारी रात्री विषप्राशन केले. त्यांना उपचारांसाठी नगरला हलविण्यात आले. मात्र, मंगळवारी रात्री त्यांचे निधन झाले.या प्रकरणी शनिवारी मुलीची फिर्याद कर्जत पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे. मात्र, आरोपींविरुद्ध अद्याप कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आलेली नाही. (वार्ताहर)