शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

दोन मुलांचा खून करून पित्याची आत्महत्या

By admin | Updated: January 6, 2015 02:09 IST

दोन निरागस चिमुकल्यांचा खून करून हाताच्या नसा कापून घेत झाडाला फाशी घेऊन पित्याने आत्महत्या केल्याचा खळबळजनक प्रकार औरंगाबादेत सोमवारी सकाळी उघडकीस आला़

औरंगाबाद : दोन निरागस चिमुकल्यांचा खून करून हाताच्या नसा कापून घेत झाडाला फाशी घेऊन पित्याने आत्महत्या केल्याचा खळबळजनक प्रकार औरंगाबादेत सोमवारी सकाळी उघडकीस आला़ पत्नीच्या चारित्र्यावरील संशयावरून आलेल्या नैराश्यातून या निष्ठुर पित्याने हे टोकाचे पाऊल उचल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. राम अहीर (४५) असे या पित्याचे नाव असून वीर (८) आणि अंशुमन (५) दोन दुर्दैवी मुलांची नावे आहेत. राम वेल्ंिडगच्या दुकानात काम करून आपली उपजीविका भागवीत होता. पती, पत्नी, चार मुली आणि दोन मुले, असे त्याचे कुटुंब. त्याच्या दोन मुली विवाहित आहेत. एक अविवाहित मुलगी एका आश्रमात राहते. एक मुलगी, पत्नी आणि दोन चिमुकल्या मुलांसह राम चौधरी कॉलनीतील गोरखनगरमध्ये भाड्याच्या खोलीत राहत होता. रामला पत्नी ज्योतीच्या चारित्र्यावर संशय होता. दोन आठवड्यांपूर्वी या दोघांमधील वाद विकोपाला गेला. तेव्हा ज्योती ही एका मुलीला घेऊन याच परिसरात राहणाऱ्या आईकडे वास्तव्यास गेली. वीर व अंशुमनला रामने आपल्याकडेच ठेवले. तो घरी नसताना ही मुले दिवसा आईकडे जात. सायंकाळी पुन्हा वडिलांकडे येत. सोमवारी सकाळी चिकलठाणा बाजारतळाजवळच लिंबाच्या झाडाखाली एक व्यक्ती पडलेला असल्याचे तेथून जाणाऱ्या एकाच्या नजरेस पडले. काय झाले पाहण्यासाठी राम अहिरचा पुतण्याही तेथे पोहोचला असता हा प्रकार उघडकीस आला. रामच्या हाताच्या नसा कापलेल्या होत्या. त्याने लिंबाच्या झाडाला फाशी घेतल्यानंतर फांदी तुटल्याने तो खाली पडला होता; परंतु तोपर्यंत त्याला फास बसल्याने त्याचा मृत्यू झाला होता. (प्रतिनिधी)चिठ्ठीत दोघांची नावेरामने आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत दोन जणांची नावे लिहून ठेवलेली आहेत. त्यातील एक जण दूध विक्रेता असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. या दोघांचे आपल्या पत्नीसोबत संबंध असल्याचा रामचा संशय होता, असे सूत्रांनी सांगितले. त्या दिशेने पोलिसांनी तपास सुरू केला आहे.