बदलापूर : येथील लोकमान्यनगरमध्ये राहणाऱ्या पवन माणिकचंद वर्मा (३५) यांनी आपल्या राहाटोली येथील फ्लॅटमध्ये कोमल (१०), मीना (६) या आपल्या मुलींचा गळा दाबून खून करून स्वत: आत्महत्या केली. हे तिघेही काल रात्री घराबाहेर पडल्यापासून बेपत्ता होते. बिल भरण्यास म्हणून ते बदलापूरला आले होते. त्यानंतर त्यांचा कोणताच थांगपत्ता नसल्याने त्यांच्या पत्नी नीता यांनी वर्तकनगर पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार दाखल केली होती. तक्रार दाखल झाल्यावर ठाणे पोलिसांनी बदलापूरच्या पोलिसांशी संपर्क साधला असता त्यांनी या फ्लॅटकडे धाव घेतली. तो उघडला असता या तिघांचे मृतदेह आढळून आले. वर्मा यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे निष्पन्न झाले. त्यांनी आपल्या सुसाईड नोटमध्ये गृहकर्जामुळे आत्महत्या करीत असल्याचे नमूद केले होते.
मुलींचा खून करून पित्याची आत्महत्या
By admin | Updated: September 29, 2014 07:42 IST