शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

मुलींना विष पाजून वडिलांची आत्महत्या

By admin | Updated: November 13, 2016 04:43 IST

संपत्तीच्या वादातून पोटच्या तीन मुलींना विष देऊन वडिलांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना साकीनाका येथे घडली. यामध्ये भावासोबत असलेल्या संपत्तीच्या वादातून

मुंबई : संपत्तीच्या वादातून पोटच्या तीन मुलींना विष देऊन वडिलांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना साकीनाका येथे घडली. यामध्ये भावासोबत असलेल्या संपत्तीच्या वादातून त्याने हे पाऊल उचलल्याबाबतची सुसाईड नोट पोलिसांच्या हाती लागली आहे. सुसाईड नोटच्या आधारे आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी भावाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती साकीनाका पोलिसांनी दिली. मंगेश राजाराम आणेराव (४०) असे या वडिलांचे नाव आहे. बेरोजगार आणेराव यांना दारूचे व्यसन होते. साकीनाका परिसरातील मोहली पाइपलाइन, रमेश सुदन चाळीत ते पत्नी, एक मुलगा आणि तीन मुलींसोबत राहायचे. अज्ञना (१), आरोही (१), हर्षिता (४) अशी त्यांच्या चिमुकलींची नावे आहेत. याच घरात त्यांचा भाऊ नरेंद्र, त्याची पत्नी आणि वडीलदेखील राहतात. शनिवारी सकाळी ७च्या सुमारास घरात कोणी नसताना आणेराव यांनी त्यांच्या एक वर्षाच्या दोन जुळ्या मुली आणि चार वर्षांच्या एका मुलीला विष पाजले. त्यांचा मृत्यू झाल्याचे लक्षात येताच त्यांनी स्वत:ही गळफास घेत स्वत:ला संपविले. यामध्ये चौघांचाही मृत्यू झाला.या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी स्थानिक रुग्णालयात पाठविले. घटनास्थळी पोलिसांना एक सुसाईड नोट सापडली आहे. यामध्ये आणेराव आणि त्यांच्या भावाचे राहत्या घराच्या वाट्यावरून वाद सुरू होते.या घटनेमुळे साकीनाका परिसरात शोककळा पसरली आहे. (प्रतिनिधी) घर विकण्याच्या निर्णयाला विरोधमंगेश यांचे वडील राजाराम यांनी हे घर विकून त्याचे तीन वाटे करण्याचे ठरविले. ज्यात एक वाटा आणेराव, दुसरा नरेंद्र तर तिसरा त्यांचे वडील राजाराम यांचा असणार होता. मात्र रूम विकण्याच्या निर्णयाला आणेरावचा विरोध होता. कारण घर विकले तर राहायचे कुठे अशी चिंता त्यांना सतावू लागली. त्यावरून त्यांचे भाऊ आणि वहिनीसोबत खटके उडत होते. शनिवारी त्यांनी पत्नी आणि मुलाला मीरारोडला त्यांच्या नातेवाइकांकडे पाठविले. त्यानंतर मुलींना विष पाजून आत्महत्या केली. नातेवाईकांना ठरविले जबाबदारसुसाईड नोटमध्ये भाऊ आणि वहिनीला जबाबदार ठरविले आहे. ‘सध्या आम्ही या सर्वांच्या शवविच्छेदन अहवालाची प्रतीक्षा करीत आहोत. या प्रकरणी आत्महत्येची नोंद करण्यात आली आहे. संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात येऊ शकतो’, अशी शक्यता पोलिसांनी वर्तविली.