शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोमीलनाआधी ‘मोर्चा’मीलन; हिंदी विरोधी मोर्चात राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र
2
नग्न फोटो काढले; भयग्रस्त विद्यार्थिनीने जेवण सोडले; बीडमध्ये २ शिक्षकांकडून १० महिन्यांपासून लैंगिक छळ
3
भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण, १ जुलैला घोषणा; किरण रिजिजू निरीक्षक
4
Maharashtra Politics: हिंदीवरून महायुतीत गोंधळ, महाविकास आघाडीमध्ये ऐक्य
5
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
6
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
7
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
8
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
9
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
10
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
11
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
12
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
13
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
14
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
15
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
16
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
17
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
18
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
19
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
20
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?

अनुदानासाठी वडिलांचा खून

By admin | Updated: June 5, 2014 22:47 IST

गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीच्या अनुदानाच्या पैशांवरून पोटच्या दोन मुलांनीच बापाला मारहाण करून त्यांना जीवे मारण्याचा धक्कादायक प्रकार मोहोळ तालुक्यातील कामती खुर्द येथे उघडकीस आला आहे.

गारपिटीच्या अनुदानासाठी वडिलांचा खून !सोलापूरमधील घटना : पोटच्या मुलांची बापाला लाथाबुक्क्यांनी मारहाणसोलापूर : गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीच्या अनुदानाच्या पैशांवरून पोटच्या दोन मुलांनीच बापाला मारहाण करून त्यांना जीवे मारण्याचा धक्कादायक प्रकार मोहोळ तालुक्यातील कामती खुर्द येथे उघडकीस आला आहे.भगवान मारुती कांबळे (वय ७२, रा. कामती खुर्द, ता. मोहोळ) असे या दुर्दैवी वृद्ध शेतकर्‍याचे नाव आहे. कामती येथे त्यांची शेतजमीन आहे. कांबळे यांना तीन मुले आहेत. फेब्रुवारी महिन्यात झालेल्या गारपिटीमुळे त्यांच्या शेतातील पिकांचे अतोनात नुकसान झाले. शासनाने पंचनामे करून शेतकर्‍यांना भरपाई देण्याची योजना आणली. गारपीट योजनेचे अनुदान भगवान कांबळे यांच्या बँकेतील खात्यावर जमा झाले. अनुदानाचे पैसे आल्याचे समजताच त्यांच्या मुलांमध्ये भांडणे सुरू झाली. २८ मे रोजी सकाळी साडेनऊ वाजता दत्तात्रय व संजय या दोघांनी कांबळे यांच्याकडे अनुदानाच्या पैशांची मागणी केली. यावरून त्यांच्यात वाद सुरू झाला. कांबळे यांनी दोघांनाही पैसे देण्यास नकार दिला. त्यामुळे संतापलेल्या दत्तात्रय व संजय या दोघांनी त्यांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. त्यात ते बेशुद्ध झाले. वडील निपचित पडल्याचे पाहून दोघांनी पळ काढला. तिसरा मुलगा विजय याने कांबळे यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले. उपचार सुरू असताना ५ जून रोजी दुपारी तीन वाजता त्यांच्या मृत्यू झाला. सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्ह्याची नोंद झाली. (प्रतिनिधी)