शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

तारा भवाळकर यांचा सत्कार, वेळ, मधुशाला वगैरे ...

By admin | Updated: January 22, 2017 01:16 IST

मुलुंडच्या महाराष्ट्र सेवा संघात सातत्याने होणाऱ्या कार्यक्रमांमुळे सांस्कृतिक वातावरण जागतं राहतं. अशापैकीच एक कार्यक्रम म्हणजे, महाराष्ट्र सेवा संघाचा सुं. ल. गद्रे साहित्यिक पुरस्कार.

- रविप्रकाश कुलकर्णीमुलुंडच्या महाराष्ट्र सेवा संघात सातत्याने होणाऱ्या कार्यक्रमांमुळे सांस्कृतिक वातावरण जागतं राहतं. अशापैकीच एक कार्यक्रम म्हणजे, महाराष्ट्र सेवा संघाचा सुं. ल. गद्रे साहित्यिक पुरस्कार. दरवर्षी वैशिष्ट्यपूर्ण लेखन करणाऱ्या एका लेखकाची वा लेखिकेची निवड या पुरस्कारासाठी केली जाते. यापूर्वी २३ पुरस्कार दिले गेले. यंदाचे त्यांचे २४वे वर्ष. त्या पुरस्करासाठी त्यांनी एरवी पटकन लक्षात येत नाही, अशा लोकसंस्कृती, लोकसाहित्य, लोकपरंपरांच्या अभ्यासिका - लेखिका तारा भवाळकर यांची निवड केली. यावरून सुं.ल.गद्रे साहित्यिक पुरस्कार देताना, त्यांची निवड समिती किती चोखंदळ आहे, हे दिसते.महाराष्ट्र सेवा संघाचे वैशिष्ट्य म्हणजे, त्यांचे कार्यक्रम वेळेत सुरू होतात. त्यांच्या कार्यक्रम पत्रिकेवर ठळकपणे- ‘कार्यक्रम वेळेवर सुरू होईल’ याची कृपया नोंद घ्यावी, असे लिहिलेले असते. मात्र, यंदा पुरस्कार लाभलेल्या तारा भवाळकर, त्यांची मुलाखत घेणारे मुुकुंद कुळे आणि प्रमुख पाहुण मधु मंगेश कर्णिक हे तिघेही वेळेआधीच उपस्थित होते, पण रसिकांची पुरेशी उपस्थिती नसल्यामुळे कार्यक्रम उशिरा सुरू झाला. कारण काहीही असतील, पण संघाने कार्यक्रम वेळेवर सुरू करण्याची प्रथा मोडू नये. कार्यकर्ता मंडळी या विचारांशी सहमत होवोत आणि यापुढे वेळेत कार्यक्रम सुरू होईल, या सूचनेशी एकनिष्ठ राहतील, अशी अपेक्षा करतो.लोकसाहित्यातील कामगिरीसाठी तारा भवाळकर ख्यात आहेत. त्यासंदर्भात अधिक जाणून घेण्यासाठी या कार्यक्रमाला मी गेलो होतो. आणखी एक कारण होतं, त्यांनी कधी काळी हरिवंशराय बच्चन यांच्या ‘मधुशाळा’चं मराठी भाषांतर केलेले आहे. आज मधुशालाचं मराठी भाषांतर किमान ५-७ जणांनी तरी नक्कीच केलं आहे, पण तारा भवाळकर या त्यातल्या पहिल्या असाव्यात. त्या संबंधात त्यांच्याकडून जाणून घ्यावे, हा विचार होता. मुकुंद कुळे यांनी तारा भवाळकरांना त्यांच्या लोकसाहित्य, लोकपरंपरांसंदर्भात चांगलं सविस्तर बोलकं केलं. त्यांना शेवटचा प्रश्न केला, तो मधुशाळा संदर्भात. तारा भवाळकरांनी शाळा कॉलेजच्या दिवसातच हा संग्रह अनुवादित केला होता. तो दहा वर्षे तसाच पडून राहिला, मग पुढे त्यांना प्रकाशक मिळाला! हे ऐकल्यावर मात्र ठरवलं कार्यक्रमानंतर तारा भवाळकरांशी बोलायलाच हवं. काही प्रश्न मी करताच त्या म्हणाल्या, ‘इंद्रायणी साहित्याचे दयार्णव कोपर्डेकर यांना घेऊन इंडिया बुक हाउसचे बल्लाळ माझ्याकडे काहीतरी पुस्तक द्या म्हणून आले आणि मी दिलं.’ हे पुस्तक यथावकाश आउट आॅफ प्रिन्ट झालं. इंडिया बुक हाउस आता अस्तित्वात नाही. मग आता तारा भवाळकर हे नाव प्रस्थापित झालं असताना, मधुशालाची नवीन आवृत्ती का काढत नाही? असं मी विचारताच, त्या म्हणतात, ‘अनुवादाची परवानगी! त्या वेळी हरिवंशराय बच्चन यांनी परवानगी दिली होती, पण आता ते गेले. मग परवानगी मागायचा सव्यापसव्य कोण करणार? कुणी प्रकाशकानेच ते करावं.’ मला वाटतं, हरिवंशराय बच्चन यांनी काय फक्त एका आवृत्तीच्या अनुवादाची परवानगी दिली असेल का? ते पाहायला हवे. मात्र, कुणा प्रकाशकाने लक्ष घातले तर ते अवघड ठरू नये. हे लक्ष वेधण्यासाठीच लिहिले आहे.