शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
7
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
8
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
9
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
10
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
11
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
12
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
13
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
14
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
15
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
16
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
17
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
18
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
19
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
20
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
Daily Top 2Weekly Top 5

नराधार महिलेला गणेशाचा आधार...

By admin | Updated: July 25, 2016 20:24 IST

लाडक्या गणरायाचे आगमन महिनाभरावर येऊन ठेपले आहे. गणेश मूर्ती निर्मितीच्या कामाला वेग आला आहे. गणेश मूर्ती निर्मिती आणि विक्रीतून शेकडो हातांना रोजगार मिळतो

संघर्षगाथा: गणेश मूर्ती निर्मितीतून लावतेय घराला हातभारअकोला: लाडक्या गणरायाचे आगमन महिनाभरावर येऊन ठेपले आहे. गणेश मूर्ती निर्मितीच्या कामाला वेग आला आहे. गणेश मूर्ती निर्मिती आणि विक्रीतून शेकडो हातांना रोजगार मिळतो. अनेकांना बाप्पाने आधार दिला. असाच आधार अकोल्यातील निराधार महिलेला मिळालेला आहे. गणेश मूर्ती निर्मितीतून ती घरासोबतच मुलीच्या शिक्षणाला हातभार लावत आहे. अकोल्यातील वसंत देसाई क्रीडांगणासमोरील जागेत लता सुरेश श्रृंगारे या महिलेने झोपडी थाटून गणेश मूर्तीच्या निर्मिती कामाला सुरुवात केली.

गणेश मूर्ती निर्मितीचा लताबार्इंचा पिढीजात व्यवसाय आहे. या व्यवसायाच्या भरवशावरच तिच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. चार वर्षांपूर्वीच तिच्या पतीचे निधन झाले. त्यामुळे लताबाई खचली. मुलीचे शिक्षण कसे करावे, कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा चालवावा, असा प्रश्न तिच्यासमोर उभा राहिला.

पतीसोबत ती गणेश मूर्ती निर्मितीच्या कामात मदत करायची. गणेश मूर्ती घडविण्याचे कौशल्य तिला पतीने शिकविले होते. या कौशल्याचा आधार घेत, लताबाईने नव्या उमेदीने गणेश, शारदा, मूर्ती घडविण्याचे कार्य हाती घेतले. बाजारातून प्लास्टर, कलर, डिस्टेम्बर आणून तिने मूर्ती घडवायला सुरुवात केली. तिची लहान मुलगी सध्या इयत्ता दहावीला शिकते आहे. तीही लताबाईला या कामात मदत करते. मोठ्या मुलीचे लग्न झाले. दोघी मायलेकी झोपडीवजा घरात राहतात. गणेश मूर्ती निर्मितीतून लताबाई मुलीला शिकविण्याचा प्रयत्न करीत आहे.

तिने शेकडो गणेश मूर्ती घडविल्या. सध्या गणेश मूर्तींना आकार देण्याचे, रंगरंगोटी करण्याचे काम ती करीत आहे. अवघ्या महिनाभरावर गणरायाचे आगमन येऊन ठेपले. त्यापूर्वी आकर्षक गणेश मूर्ती तयार करून त्या बाजारात पाठविण्यासाठी लताबाईची धडपड सुरू आहे. गणेश मूर्ती निर्मितीचे साहित्य महागल्याने यंदा गणेश मूर्तींच्या किमतीतही वाढ होणार असल्याचे लताबाईने सांगितले. गणेश मूर्ती घडविण्याच्या कौशल्यामुळे आणि सण-उत्सवामुळे निराधार महिलेला आधार मिळतो आहे.

लताबाईचा सुरू असलेला संघर्ष, मुलीला शिकविण्याची धडपड प्रेरणादायी आहे. सतत अतिक्रमण निर्मूलन पथकाची भीतीलताबाईसारखे अनेक मूर्तिकार वसंत देसाई क्रीडांगणासमोरील जागेत झोपड्या थाटून गणेश मूर्ती घडविण्याच्या कामात मग्न झाले आहेत. लताबाईसोबतच या सर्व मूर्तिकारांना मनपाच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाची कायम भीती असते. अतिक्रमण हटविताना बऱ्याचदा अत्यंत मेहनतीने बनविलेल्या गणेश मूर्तींचे नुकसान होते. गणेश उत्सव येण्याच्या दोन-तीन महिने तरी आम्हाला काम करू द्यावे, अशी अपेक्षा लताबाईने बोलताना व्यक्त केली.