शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

नेहरूंविरोधात बोलण्याची फॅशन

By admin | Updated: March 13, 2016 04:53 IST

पंडित जवाहरलाल नेहरू यांना समजून न घेताच त्यांच्या धोरणांवर टीका करण्याचा प्रकार सध्या देशात सुरू झाला असून, हा प्रकार चिंताजनक असल्याचे प्रतिपादन माजी केंद्रीय गृहसचिव माधवराव गोडबोले

औरंगाबाद : पंडित जवाहरलाल नेहरू यांना समजून न घेताच त्यांच्या धोरणांवर टीका करण्याचा प्रकार सध्या देशात सुरू झाला असून, हा प्रकार चिंताजनक असल्याचे प्रतिपादन माजी केंद्रीय गृहसचिव माधवराव गोडबोले यांनी शनिवारी मराठवाडा साहित्य परिषदेच्या विशेष वाङ्मय पुरस्कार प्रदान कार्यक्रमात केले. साहित्य परिषदेच्या वतीने दरवर्षी देण्यात येणाऱ्या दोन विशेष पुरस्कारांचे वितरण प्रसिद्ध साहित्यिक डॉ. विलास खोले यांच्या हस्ते करण्यात आले. यशवंतराव चव्हाण वाङ्मय पुरस्कार माधवराव गोडबोले यांना त्यांच्या ‘जवाहरलाल नेहरूंचे नेतृत्व : एक सिंहावलोकन’ या ग्रंथासाठी, तर रंगभूमीच्या लक्षणीय कामगिरीसाठी देण्यात येणारा नटवर्य लोटू पाटील नाट्य पुरस्कार लातूरचे श्रीराम गोजमगुंडे यांना प्रदान करण्यात आला. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक डॉ. नागनाथ कोत्तापल्ले होते.मी काही इंदिरा गांधी, नेहरू अथवा काँग्रेसचा भक्त नाही; परंतु ज्यांनी नेहरू वाचले नाही, समजून घेतले नाही, अशा व्यक्ती दिमाखात त्यांच्या विरोधात बोलतात. जणू नेहरू यांच्या कार्याविषयी बोलण्याची फॅशनच आली आहे. एखाद्या महत्त्वपूर्ण व्यक्तीविषयी बोलताना अभ्यासपूर्ण बोलायला हवे, असे सांगून गोडबोले म्हणाले, आज हिंदूराष्ट्र संकल्पनेवर बोलले जाते. मात्र महत्त्वाची गोष्ट म्हणजे नेहरू नसते तर सर्वधर्म समभावच देशात दिसला नसता. आज जी काही विविध विषयांवर मतप्रदर्शने होत आहेत, ती अभ्यासपूर्ण नाहीत.आपण साडेतीन वर्षांहून अधिक काळ यशवंतराव चव्हाण यांच्यासोबतही काम केले. स्वातंत्र्यानंतर देशाला मिळालेले ते सर्वाेत्तम गृहमंत्री होते, असेही ते म्हणाले. मसापचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील, उपाध्यक्ष किरण सागर व अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होती. (प्रतिनिधी)