शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

हरितगृह शेती करण्याकडे विदर्भातील शेतक-‍यांचा कल!

By admin | Updated: April 3, 2015 02:25 IST

बुलडाणा जिल्हा बनले बिजोत्पादाचे जागतिक हब!

अकोला - संरक्षित शेती संकल्पनेला विदर्भातील शेतकर्‍यांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून, पॉलीहाऊस-शेडनेट उभारणीकडे त्यांचा कल वाढला आहे. जगातील सर्वच नामवंत बियाणे कंपन्या बुलडाणा जिलतील देऊळगावराजा येथे शेडनेटमधून बिजोत्पादनाचा कार्यक्रम घेत असल्याने या गावाचे नाव आंतराराष्ट्रीय स्तरावर पोहोचले आहे. देशात कर्नाटक आणि महाराष्ट्रातील बुलडाणा जिलतील देऊळगावराजा या दोनच ठिकाणी भाजीपाला, मिरची व वेलवर्गीय भाज्यांच्या बिजोत्पादनाचा कार्यक्रम शेडनेट, पॉलीहाउसमधून घेण्यात येत आहे. सुरुवातीला कर्नाटकातील राणी बिन्नोर येथेच शेडनेटमध्ये बिजोत्पादन घेतले जात होते. तथापि, देऊळगावराजा येथील शेतकर्‍यांनी या बिजोत्पादन कार्यक्रमाचे नवे तंत्रज्ञान आत्मसात केल्यानंतर शेडनेटमध्ये बिजोत्पादन घेणारे देऊळगावराजा हे देशातील दुसरे केंद्र बनले. या भागात संकरित टोमॅटो, मिरची, ढोबळी मिरची, वेलवर्गीय भाजीपाला, काकडी आदी सर्वच प्रकारच्या भाजीपाला पिकांचे बिजोत्पादन केले जाते. या भागातील वातावरण बिजोत्पादनासाठी पोषक असल्याने या क्षेत्रामध्ये कार्यरत जगातील बहुतांश कंपन्यांनी देऊळगावराजात पाय रोवले आहेत. या शेतकर्‍यांना दहा गुंठा क्षेत्रात बिजोत्पादन घेण्यासाठी दोन लाख रुपये मिळत असल्याने या भागात शेडनेट शेतीचा चांगलाच विस्तार झाला आहे. बिजोत्पादनाचे काम कौशल्यआधारित असल्याने शेतकर्‍यांना प्रशिक्षणाची गरज भासते. सध्या राज्यात पुणे येथे शेतकर्‍यांना पाच दिवसांचे प्रशिक्षण दिले जात आहे. ही सोय प्रत्येक कृषी विज्ञान केंद्रामार्फत केल्यास शेतकर्‍यांना सोयीचे होईल. शेडनेट शेतीसाठी शासनाकडून पूरक अनुदानाची गरज शेतकर्‍यांनी अधोरेखित केली आहे. शासनाकडून देण्यात येणार्‍या अनुदानात मजबूत शेडनेट घालता येत नाही. दुसरीकडे ज्या कंपन्या येथे बिजोत्पादन घेतात, त्या शेडनेट उभारण्यासाठी शेतकर्‍यांना सुरुवातीला ५0 हजारांपर्यंत रक्कम उपलब्ध करतात. दरम्यान, बुलडाणा कृषी विज्ञान केंद्रातर्फे शेतकर्‍यांना यासंबधीची प्राथमिक माहिती दिली जात आहे. तथापि, परिपूर्ण प्रशिक्षणाची गरज शेतकर्‍यांना आहे. त्यासंबंधी प्रयत्न सुरू असून, निधी मिळवण्यासाठी शासनाकडे प्रयत्न केले जाणार आहेत.