शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

शेतक-यांचा कल वाढला; देशी कापूस फुलला!

By admin | Updated: October 31, 2016 23:20 IST

कापूस संशोधन केंद्रावरील एक हजार हेक्टरवर पेरणी.

अकोला, दि. ३१- मागील दोन वर्षांपासून देशी कापूूस उत्पादनाकडे शेतकर्‍यांचा कल वाढला असून, पुढच्यावर्षी शेतकर्‍यांना हे बियाणे सहज उपलब्ध व्हावे, याकरिता डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने कापूस संशोधन प्रक्षेत्रावरील १00 हेक्टरवर देशी कापसाची लागवड केली आहे. विदर्भातील शेतकर्‍यांनी या कापसाचे प्रात्यक्षिक बघून या कापसाचा पेरा वाढवावा, हा या मागील कृषी विद्यापीठाचा उद्देश आहे. यावर्षी कृषी विद्यापीठाने त्यांच्या मुख्य बीजोत्पादन प्रक्षेत्र, मध्यवर्ती संशोधन केंद्र, अचलपूर, यवतमाळ, वाशिम व अकोला येथील कापूस संशोधन प्रक्षेत्रावर प्रमाणित, पायाभूत व पैदासकार देशी कापसाची पेरणी केली आहे. हे बियाणे पुढच्यावर्षी शेतकर्‍यांना पेरणीसाठी उपलब्ध केले जाणार आहे. मागील चार-पाच वर्षांपासून पावसाचे प्रमाण कमी होते; परिणामी देशी कापूस बियाणे उत्पादनावर परिणाम झाला होता. या बियाण्याचा निर्माण झालेला तुटवडा बघता, यावर्षी देशी बीजोत्पादनावर अधिक लक्ष देण्यात आले आहे. दरम्यान, बीटी कपाशीचे क्षेत्र वाढले असून, देशी कापूस नाममात्र उरला आहे. तथापि बीटीला तोंड देण्यासाठी कृषी विद्यापीठाने अनेक नवे कापसाचे वाण निर्माण केले असून, पावसाचा ताण सहन करणारे व कमी दिवसात येणार्‍या कापसाच्या वाणांचा यामध्ये समावेश आहे. अतिघनता लागवड पद्धतीने देशी कापसाचे उत्पादन घेतल्यास बीटी कापसाच्या बरोबरीने उत्पादन येत असून, हा कापूस काढल्यानंतर या क्षेत्रावर दुबार म्हणजेच रब्बी पीक घेता येते. त्यामुळे या कापसाचा पेरा विदर्भात वाढण्याची शक्यता कृषी तज्ज्ञांनी वर्तविली आहे. कृषी विद्यापीठाने देशी कापसाचे प्रात्यक्षिक लावण्यात आले आहे. यामध्ये प्रामुख्याने डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या देशी कपाशी वाणांचा समावेश आहे. देशी कापसाचा पेरा वाढावा, हा यामागील उद्देश असून, यावर्षी बर्‍याच शेतकर्‍यांनी देशी कापसाची पेरणी केली आहे. चालू खरीप हंगामात शेकडो शेतकर्‍यांची मागणी असताना हे बियाणे उपलब्ध होऊ शकले नाही. - कृषी विद्यापीठाच्या कापूस प्रक्षेत्रावर १00 हेक्टर देशी कापसाची पेरणी करण्यात आली आहे. यावर्षी प्रमाणित, पायाभूत व पैदासकार बियाणे निर्मितीवर लक्ष केंद्रित केले आहे. पुढच्यावर्षी शेतकर्‍यांना हे बियाणे सहज उपलब्ध व्हावे, हा या मागील उद्देश आहे. - डॉ. टी.एच. राठोड, विभागप्रमुख,कापूस संशोधन केंद्र, डॉ.पंदेकृवि, अकोला.