शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांची ‘तूर’कोंडी!

By admin | Updated: April 25, 2017 02:50 IST

सरकारने नाफेडमार्फत हमीभावाने तूरखरेदी बंद केल्याने, तूर उत्पादक आर्थिक संकटात सापडले असून, खरेदी पुन्हा सुरू झाली नाही

मुंबई : सरकारने नाफेडमार्फत हमीभावाने तूरखरेदी बंद केल्याने, तूर उत्पादक आर्थिक संकटात सापडले असून, खरेदी पुन्हा सुरू झाली नाही, तर त्यांच्या संतापाचा कधीही उद्रेक होऊ शकतो. राज्यातील खरेदी केंद्रांवर सुमारे १५ लाख तर शेतकऱ्यांकडे तब्बल सात लाख क्विंटल तूर खरेदीविना शिल्लक असताना, केंद्र सरकार मात्र खरेदीस मुदतवाढ न देण्यावर ठाम आहे. २२ एप्रिलपासून सरकारने तूरखरेदी बंद केली आहे. खरेदी केंद्रांवर लाखो क्विंटल तूर खरेदीविना पडून असताना, सरकारने घेतलेल्या या निर्णयाचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. नाफेडची केंद्रे बंद होताच व्यापाऱ्यांनी तुरीचे भाव पाडले. शनिवारपर्यंत सरकारने ५०५० रु. दराने तूरखरेदी केली. मात्र, सोमवारी खुल्या बाजारात तुरीचा भाव ३००० रु.पर्यंत खाली आला. त्यामुळे तातडीने खरेदी पुन्हा सुरू करावी, अशी मागणी विरोधकांनी केली आहे. तुरीची कोंडी फोडण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय ग्राहक कल्याण मंत्री रामविलास पासवान यांची दिल्लीत भेट घेतली. २२ एप्रिलपर्यंत केंद्रांवर आलेल्या मालाची खरेदी करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांनी केली. शिवाय, आयात तुरीवरील शुल्क १० टक्क्यांवरु न २५ टक्के करावे आणि तूर खरेदीसाठी ठोस धोरण आखावे, अशा मागण्याही त्यांनी केल्या. आतापर्यंत हमीभावाने ३९ लाख क्विंटल तूर खरेदी झाली असून तब्बल सुमारे ८ लाख क्विंटल माल खरेदी केंद्रांवर शिल्लक असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे. मात्र शेतकऱ्यांकडे अजूनही तूर शिल्लक आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)

शेतकऱ्यांचा विश्वासघात - विखेशेवटच्या दाण्यापर्यंत तूरखरेदी करण्याचे आश्वासन देऊनही शासकीय खरेदी केंद्रांवर खरेदीस नकार देणे, हा शेतकऱ्यांचा विश्वासघात आहे. सरकारची खरेदीची क्षमता संपली आहे. अधिक तूरखरेदी करण्यासाठी केंद्रीय अर्थमंत्र्यांची परवानगी घ्यावी लागेल, असे केंद्रीय अन्न व नागरी पुरवठामंत्री सांगत आहेत. म्हणजेच यंदा नेमकी किती तूर झाली व किती तूर शासकीय खरेदी केंद्रांवर येईल, याचा साधा अभ्याससुद्धा हे सरकार वेळेत करू शकलेले नाही. - राधाकृष्ण विखे-पाटील, विरोधी पक्षनेते, विधानसभा