शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

तहसीलदार कार्यालयात शेतकऱ्याची आत्महत्या

By admin | Updated: May 11, 2017 03:27 IST

मुरबाड तालुक्यातील शेलगाव येथील अशोक शंकर देसले (५८) या शेतकऱ्याने बुधवारी तहसीलदार कार्यालयाच्या इमारतीवरून उडी मारून

लोकमत न्यूज नेटवर्कमुरबाड : मुरबाड तालुक्यातील शेलगाव येथील अशोक शंकर देसले (५८) या शेतकऱ्याने बुधवारी तहसीलदार कार्यालयाच्या इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. मृताच्या नातेवाइकांनी मात्र ही आत्महत्या नसून मुरबाडचे तहसीलदार आणि कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी देसले यांना मारहाण करून खून केल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल केल्याने या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे.अशोक देसले हे मुरबाड तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष होते. देसले यांच्या वडिलांच्या नावावरची जमीन त्यांच्या चुलत भावाने फसवणुकीने स्वत:च्या नावावर करून हडप केल्याची तक्रार देसले यांनी आॅक्टोबर २०१६ मध्ये मुरबाड तहसीलदार कार्यालयात केली होती. त्याचा पाठपुरावा करण्यासाठी ते सतत तहसीलदार कार्यालयात हेलपाटे मारत होते. फिर्यादी तानाजी देसले (अशोक देसले यांचे भाऊ) यांनी तहसीलदार सर्जेराव म्हस्के-पाटील यांना या अर्जाबाबत विचारणा केली असता उद्धट भाषा वापरत त्यांनी तानाजी यांना बाहेर काढले. तसेच हे प्रकरण हाताळण्यासाठी दोन लाखही मागितले होते. बुधवारी बुद्धपौर्णिमेची सुटी असतानाही अशोक देसले यांना बोलावण्यात आल्याचा आरोपही नातेवाईकांनी फिर्यादीत केला आहे. दरम्यान, अशोक देसले यांच्या मृत्यूची वार्ता समजताच टोकावडे परिसरातील शेकडो शेतकऱ्यांनी मुरबाड येथे धाव घेऊन तहसीलदारांना अटक करण्याची मागणी केली. लोकांना शांत करण्यासाठी मुरबाडचे आ. किसन कथोरे बराच वेळ मुरबाड पोलीस ठाण्यात तळ ठोकून होते. मात्र, आ. कथोरे हे तहसीलदारांना पाठीशी घालत असल्याचा आरोप करून देसले यांच्या नातेवाइकांनी कथोरे यांची गाडी अडवली.