रेल (अकोला) : गिरजापूर येथील शेतकरी विनोद बाबाराव इंगळे (३५) यांनी विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी घडली. इंगळे यांच्याकडे दीड एकर शेती होती. त्यांच्यावर बँकेचे, तसेच सावकारी कर्ज होते. त्यांच्या मागे आई-वडील, भाऊ, पत्नी, मुलगा, मुलगी असा आप्त परिवार आहे. पोलिसांनी याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून, तपास सुरू आहे.
विहिरीत उडी घेऊन शेतक-याची आत्महत्या
By admin | Updated: September 30, 2015 23:50 IST