शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

कर्जाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या

By admin | Updated: May 4, 2017 02:18 IST

शिर्सुफळ (ता. बारामती) येथील शेतकरी काशिनाथ सिधू हिवरकर (वय ६०) या शेतकऱ्याने कर्जाचा बोजा झाल्याने आपली

बारामती : शिर्सुफळ (ता. बारामती) येथील शेतकरी काशिनाथ सिधू हिवरकर (वय ६०) या शेतकऱ्याने कर्जाचा बोजा झाल्याने आपली जीवनयात्रा संपवली. महिन्याभरात बारामती तालुक्यातील दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याने राजकीय पंढरी हादरून गेली आहे. काशिनाथ सिधू हिवरकर यांच्याकडे सोसायटी, बँक आणि खासगी सावकार तसेच संबंधातील लोकांचे हातउसने घेतलेले पैसे याचा बोजा वाढत चालला होता. त्यामुळे त्यांच्याकडे या सर्व लोकांनी तगादा लावला होता. सततच्या दुष्काळामुळे शेतीतून कोणत्याही प्रकारच्या उत्पन्नाची मदत मिळाली नाही. त्यातच कोणत्याही शेतमालाला बाजारभाव नसल्याने कर्ज कोणत्या आधारे फेडायचे, अशा प्रकारचा मोठा गंभीर प्रश्न उभा राहिला आहे. त्यातच काशिनाथ सिधू हिवरकर यांची सून मागील ६-७ वर्षांपासून सतत आजारी असल्यामुळे त्यांच्या उपचाराच्या खर्चाने ते कर्जबाजारी झाले होते. त्यामुळे रात्री जेवण करताना आता मला आत्महत्येशिवाय पर्याय राहिलेला नाही, असे त्यांनी आपल्या घरच्यांना सांगितले. त्यांनी रात्री तीनच्या सुमारास राहत्या घरात गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. सदर घटनेच्या ठिकाणी पोलिसांनी सकाळी ६ वाजता भेट दिली. त्यांच्यामागे पत्नी, मुलगा, मुलगी, सून व नातवंडे असा परिवार आहे. हिवरकर कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी जिल्हा परिषद सदस्य रोहित पवार यांनी भेट दिली. बारामती तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष संभाजी होळकर यांनी भेट दिली, त्यांच्या परिवाराचे सांत्वन केले. १५ वर्षे दुष्काळ तसाच... बारामती तालुक्यातील अर्धा भाग सतत दुष्काळी आहे. पिण्याच्या पाण्यासह शेती, जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण होतो. अर्धा भाग नीरा डावा कालव्यामुळे सिंचनाखाली आला आहे. जिरायती भागाला उपसासिंचन योजनेखाली आणण्याचा प्रयत्न झाला. मात्र, मनमानी पद्धतीने आवर्तने दिली जात आहे. राष्ट्रवादी कॉँग्रेस-कॉँग्रेस आघाडीचे सरकार असतानादेखील १५ वर्षांत येथील दुष्काळ हटला नाही. भाजपाच्या काळातदेखील तीच परिस्थिती आहे. त्यामुळे बारामतीसारख्या राजकीय पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तालुक्यात महिनाभरातच दोन शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या आहेत. विदर्भ, मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे लोण बारामती, इंदापूरात आले आहे.राज्य सरकाराला अहवाल पाठवणार : तहसीलदारबारामतीचे तहसीलदार हनुमंत पाटील यांनी हिवरकर कुटुंबीयांची भेट घेतली. मयत शेतकरी काशीनाथ हिवरकर यांच्या आत्महत्येबाबत माहिती घेतली. या बाबतचा अहवाल राज्यसरकाला पाठवण्यात येणार आहे. त्यांच्यावरील कर्जाचा तपशीलदेखील घेतला जाणार आहे, असे ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.