कारंजा(जि. वाशिम) : कारंजा तालुक्यातील वडगाव रंगे येथील रामदास भदुजी रंगे या ६७ वर्षीय अल्पभूधारक वृद्ध शेतकर्याने सततच्या नापिकीमुळे २ मे रोजी रात्री ८ वाजताच्या दरम्यान आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.रामदास रंगे यांच्याकडे दोन एकर कोरडवाहू शेती होती. यावरच त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालत होता. सततच्या नापिकीमुळे ते आर्थिक संकटात सापडले होते. त्यांच्यावर बँकेचेही कर्ज असल्याचे सांगण्यात येते. याच नैराश्यातून त्यांनी आत्महत्या केली. पुढील तपास पोलीस करीत आहेत.
शेतकरी आत्महत्या
By admin | Updated: May 3, 2016 02:04 IST