शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी ते केले तर चीन उद्ध्वस्त होईल'; ड्रॅगनची भारताशी जवळीक वाढल्याने डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी
2
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
3
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
4
आजचे राशीभविष्य, २६ ऑगस्ट २०२५: वाद-विवादापासून दूर राहा, गोड बोलून कामे पूर्ण कराल
5
बँकिंग-फायनान्स क्षेत्रात बंपर भरती! मिळणार तब्बल २.५० लाख नोकऱ्या, छोटी शहरे केंद्रस्थानी
6
८ शुभ योगात गणपती २०२५: ८ राशींना अष्टविनायक वरदान, समृद्धी-ऐश्वर्य; वैभव-सुबत्ता, मंगल-कल्याण!
7
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा
8
'रिझर्व्हेशन'ची स्पेलिंगही न येणारे मुंबईला निघाल्यास ओबीसी रस्त्यावर उतरतील: लक्ष्मण हाकेंचा इशारा
9
२६ लाख लाडक्या बहिणींचे मानधन रोखले, छाननीचे काम सुरू, २.२९ कोटी बहिणींचे मानधन मात्र सुरूच
10
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
11
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
12
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
13
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
14
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
15
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
16
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
17
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
18
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
19
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
20
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...

राज्यातील शेतक-यांच्या सेंद्रीय शेतीकडे कल

By admin | Updated: June 17, 2015 01:40 IST

जैविक खतांचा वापर वाढला; ७.५१ लाख हेक्टरवर सेंद्रीय शेती.

नीलेश शहाकार/बुलडाणा : दुष्काळामुळे कमी होणारे उत्पादन, रासायनीक खतांमुळे होणारी शेतजमिनीची धूप, तसेच वाढणार्‍या किंमतीमुळे शेतकर्‍यांचा जैविक व सेंद्रीय खतांचा वापराकडे कल वाढला आहे. गत दोन वर्षात राज्यातील ४४,५५१ पेक्षा जास्त शेतकर्‍यांनी सेंद्रीय शेतीची कास धरली आहे. यंदा राज्यात सुमारे ७.५१ लाख हेक्टर क्षेत्र सेंद्रीय शेतीखाली आहे. रासायनिक खतांच्या असमतोल वापरामुळे पिकांची उत्पादकता कमी होते व जमिनीचीही धूप होवून जमिनीतील सूक्ष्म पोषक द्रव्यांचा नाश होतो. सुरुवातीला जरी रासायनिक खते वापरून पिकांची उत्पादकता वाढत असली तरी ते प्रमाण कालांतराने घटत जाते. त्यामुळे पर्यावरणाचा समतोल ढळू न देता अधिक उत्पादन वाढीसाठी सेंद्रीय शेती महत्वपूर्ण ठरत आहे. राज्याच्या कृषी विभागामार्फत सेंद्रिय शेतीसाठी विविध योजना राबविण्यात येत आहेत. यामध्ये शेतकरी गटांसाठी स्वतंत्र योजना आखण्यात आलेल्या आहेत. यातून गत दोन वर्षात सेंद्रीय शेती करणार्‍या शेतकर्‍यांचे १७,७0४ पेक्षा जास्त समूह तयार झाले आहेत. त्यात ४४,५५१ पेक्षा जास्त शेतकर्‍यांचा समावेश असलेले १,६८३ सेंद्रीय शेतीचे गट प्रमाणित आहेत. राज्यात एकूण पिकक्षेत्रापैकी सुमारे ७.५१ लाख हेक्टर क्षेत्र सेंद्रीय शेतीखाली आले आहे. *जैविक व सेंद्रीय खताचा वापर वाढला जैविक खते म्हणजे सेंद्रीय खतेच, परंतु जैविक खातात रायझोबियम, झोटोबॅक्टर, निलहरित शेवाळे, अझोला, फॉस्फोबॅक्टरीयम, मायकोर्‍हायझा इत्यादी सूक्ष्म जीवांचा समावेश होतो.तर सेंद्रिय खते शेणखत, कचरा खत, पिकांचे अवशेष, जनावरांचे मलमुत्र, नाल्यातील गाळ, उसाची मळी, कडूलिंबाचा पाला, शेतीतील शिल्लक कचर्‍यातून तयार होते. यामुळे जमीन-पाण्याचे प्रदुषण टाळता येवून मातीची सुपिकता कायम राहते. हे खत सहज तयार करता येते किंवा उपलब्ध होत असल्यामुळे शेतीमध्ये वापर वाढला आहे.

*मृद आरोग्य पत्रिका अभियान

     शेत जमिनीचे आरोग्य अबाधित राखण्यासाठी केंद्र शासनाकडून मृद आरोग्य पत्रिका अभियान राबविण्यात येणार आहे. राज्यातील प्रत्येक शेतकर्‍याला त्याच्या शेताची मातीची आरोग्य पत्रिका उपलब्ध करुन दयावयाची आहे. यातून मृद आरोग्य सुधारण्यासाठी जैविक खते, सेंद्रिय खते, गांडुळ खतासारख्या संथ गतीने नत्र पुरवठा करणार्‍या खतांच्या वापरास प्रोत्साहन देण्यात येणार आहे. यासाठी सन २0१५-१६ या वर्षात राज्यातील २८0 गावातून १७ हजार १२७ नमुने काढण्यात येणार आहेत.

*जैविक खत वापराचा चढता आलेख

वर्ष             जैविक खत(मे.टन)

२0११-१२          २,२00

२0१२-१३         १,0४६

२0१३-१४         २,६५0

२0१४-१५        २,४३३

२0१५-१६          ३,८७५      (नियोजन)