शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भातील शेतकरीपुत्र; ‘सर्जिकल स्टाइक’चे केले नेतृत्व, जनरल निंभोरकर यांना परम विशिष्ट सेवा पदक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 26, 2018 03:23 IST

काही महिन्यांपूर्वी पाकिस्तानात शिरून भारतीय सैन्याने केलेल्या ‘सर्जिकल स्टाइक’ची योजना आणि अंमलबजावणी करणा-या लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर यांना परम विशिष्ट सेवा पदक जाहीर करण्यात आले आहे. वर्ध्यातील वडाळा या लहानशा गावातील शेतकरीपुत्र ते लेफ्टनंट जनरल असा थक्क करणारा प्रवास करणाºया निंभोरकर यांच्या खांद्यावर सध्या जम्मू-काश्मीर येथील सीमा रक्षणाची जबाबदारी आहे.

संकेत सातोपे मुंबई : काही महिन्यांपूर्वी पाकिस्तानात शिरून भारतीय सैन्याने केलेल्या ‘सर्जिकल स्टाइक’ची योजना आणि अंमलबजावणी करणा-या लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर यांना परम विशिष्ट सेवा पदक जाहीर करण्यात आले आहे. वर्ध्यातील वडाळा या लहानशा गावातील शेतकरीपुत्र ते लेफ्टनंट जनरल असा थक्क करणारा प्रवास करणाºया निंभोरकर यांच्या खांद्यावर सध्या जम्मू-काश्मीर येथील सीमा रक्षणाची जबाबदारी आहे.पंजाब रेजिमेंटच्या कर्नल आॅफ रेजिमेंट हा मानाचा किताबही निंभोरकर यांना बहाल करण्यात आला असून लेफ्ट. जन. थोरात यांच्यानंतर असा किताब मिळविणारे ते एकमेव मराठी अधिकारी आहेत. निंभोरकर यांनी आजवर लेह, कारगिल, काश्मीर खोरे, पुंछ, ईशान्य भारत आदी ठिकाणी सेवा बजावली आहे. मेजर म्हणून बारामुल्ला भागात तैनात असताना त्यांनी तब्बल २२ अतिरेक्यांना कंठस्रान घातले होते. तसेच राजौरी भागात आॅपरेशन विजयदरम्यान शत्रूशी लढताना ते गंभीर जखमी झाले होते. आजवर त्यांना युद्ध सेवा, विशिष्ट सेवा, अतिविशिष्ट सेवा अशा अनेक पदकांनी गौरविण्यात आले आहे.अत्यंत हलाखीत बालपण गेल्यानंतर निंभोरकर यांनी सातारा सैनिकी शाळा, राष्टÑीय संरक्षण प्रबोधिनी आणि भारतीय लष्करी अकादमी असा प्रवास करीत लष्करात सर्वोच्च पद गाठले. विशेष म्हणजे त्यांचा एक भाऊ वायुदलात, तसेच दुसरा भाऊ, कन्या आणि जावई नौदलात आहेत.

टॅग्स :surgical strikeसर्जिकल स्ट्राइक