शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षणासाठी पैसे नसल्याने शेतकरीपुत्राची आत्महत्या

By admin | Updated: April 23, 2016 03:59 IST

घरी अवघी एक एकर शेती, त्यात नापिकी. संसाराचा गाडा ओढण्यासाठी पित्याची आधीच होत असलेली ओढाताण.

सायखेड (अकोला) : घरी अवघी एक एकर शेती, त्यात नापिकी. संसाराचा गाडा ओढण्यासाठी पित्याची आधीच होत असलेली ओढाताण. त्यामुळे शिक्षणासाठी पैसा कुठून येईल, या चिंतेतून नववीतील एका शेतकरी पुत्राने विष प्राशन करून स्वत:चे जीवन संपविले. दुष्काळाची दाहकता दर्शविणारी आणि मन सुन्न करणारी घटना अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी तालुक्यातील पुनोती गावात गुरुवारी घडली. आकाश मधुकर मंजुळकर असे मृत मुलाचे नाव आहे. आकाशकडून कुटुंबातील सदस्यांची होणारी ओढाताण पाहवली गेली नाही. त्यामुळे त्याने टोकाचे पाऊल उचलले. अकोलातील शेतकऱ्यांना तीन वर्षांपासून दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. कर्ज काढून पिके घ्यायची, प्रसंगी संपूर्ण कुटुंब शेतात राबायचे; मात्र हंगामाच्या शेवटी मशागत व लागवडीचाही खर्चही निघणार नाही, एवढे पीक होत आहे. शेतकरी, शेतमजुराची आत्महत्याउस्मानाबाद तालुक्यातील रामवाडी येथील गौतम भीमराव वाघमोडे (३५) या शेतकऱ्याने सततची नापिकी आणि कर्जाला कंटाळून शुक्रवारी सकाळी गळफास लावून आत्महत्या केली़त्यांच्याकडे दीड एकर शेती असून त्यांच्यावर बँकेचे कर्ज होते़ हिंगोलीतील अंधारवाडी येथे गरिबीला कंटाळून गोमाजी कान्होजी इंगळे (५०) या शेतमजुराने शुक्रवारी सकाळी राहत्या घरी आत्महत्या केली. मुलगी अनुसयाचा साखरपुडा झाल्यानंतर घरात लग्नाची तयारी सुरू होती. मात्र दुष्काळामुळे काम मिळत नसल्याने ते विवंचनेत होते.