शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor : मोठी तयारी!'ऑपरेशन सिंदूर' 2.0 होणार? पंतप्रधान मोदींना भेटण्यासाठी अजित डोवाल पोहोचले
2
Rajnath Singh : 'ऑपरेशन सिंदूर' आणि हनुमान यांचा काय संबंध? राजनाथ सिंह यांनी सांगितला श्लोकाचा खरा अर्थ
3
Naxal Attack: नक्षलवाद्यांच्या भूसुंरुग स्फोटात तीन जवानांना वीरमरण; तेलंगणाच्या जंगलात तुफान चकमक
4
Meta ने २३,००० फेसबुक अकाउंट अचानक केले गायब, 'या' लोकांवर मोठी कारवाई
5
“‘ऑपरेशन सिंदूर’ची कारवाई योग्यच, भारताने सूड घेतला, कुणी काही बोलू शकत नाही”: अण्णा हजारे
6
ऑपरेशन सिंदूर नंतर आणखी मोठी कारवाई होणार? केंद्राने हवाई दलाला दिले पूर्ण स्वातंत्र्य...
7
'ऑपरेशन सिंदूर'च्या रात्री १०.३० वाजता अखेरचं बोलणं, पहाटे ३ वाजता पुन्हा कॉल, पण...
8
प्रचंड गुप्तता, २ दिवसांपूर्वी अधिकारी क्वारंटाईन; 'ऑपरेशन सिंदूर'ची 'अशी' केली तयारी
9
“संधी मिळाली तर पाकचा खात्मा करून टाकेन”; कर्नल सोफिया कुरेशींच्या वडिलांची प्रतिक्रिया
10
पाकिस्तानच्या सुरक्षा सल्लागारांनी अजित डोवाल यांना फोन केला? तुर्की मीडियाचा दावा
11
“पाकिस्तानला कमी लेखता कामा नये, २४ तासांत कारवाई करायला हवी होती”: संजय राऊत
12
सेटवर पोलीस आले अन् अभिनेत्याला घेऊन गेले; गर्लफ्रेंडने केले गंभीर आरोप, नेमकं प्रकरण काय?
13
पाकिस्तानी कुरापती! गुजरात बॉर्डरवर आढळले संशयास्पद ड्रोन; विजेच्या तारांना धडकताच स्फोट
14
अंगावरचे कपडे फाडले, बेदम मारहाण; 'यु ट्युबर'वर रेल्वेतील पॅन्ट्री कर्मचाऱ्यांचा हल्ला, कारण...
15
PNB Share Price: १०० रुपयांपेक्षा स्वस्त मिळतोय 'हा' बँकिंग स्टॉक, मोठ्या डिस्काऊंटवर खरेदी करण्याची संधी; बँकेचा नफाही वाढला 
16
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पुढे काय? आजच्या सर्वपक्षीय बैठकीत ठरणार मोठी रणनीती!
17
"माझ्या बाबांनी आधीच भविष्यवाणी केली होती"; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर मराठी अभिनेत्रीची पोस्ट चर्चेत
18
टेलिकॉम क्षेत्रात पुन्हा जिओची बाजी! 'या' बाबतीत ठरले अव्वल; व्हीआय-BSNL जवळपासही नाही
19
बिळातून बाहेर पडले, पाकिस्तानी सैन्य अधिकारी उघडपणे दहशतवाद्यांसोबत दिसले; हा घ्या पुरावा
20
Astro Tips: रोज घराबाहेर पडताना लावलेली 'ही' छोटीशी सवय देईल दीर्घकाळ सकारात्मक परिणाम!

तूर उत्पादक शेतकऱ्यांची होतेय लूट!

By admin | Updated: February 7, 2017 05:05 IST

राज्यात यावर्षी तूर पिकाचे क्षेत्र वाढले असून उत्पादनही एकरी ३ ते ४ क्विंटल आहे; पण नाफेड प्रतवारीचे निकष लावत असल्याने शेतकऱ्यांना बाजारात तूर विकावी लागत आहे

अकोला : राज्यात यावर्षी तूर पिकाचे क्षेत्र वाढले असून उत्पादनही एकरी ३ ते ४ क्विंटल आहे; पण नाफेड प्रतवारीचे निकष लावत असल्याने शेतकऱ्यांना बाजारात तूर विकावी लागत आहे. बाजारात हमीपेक्षाही कमी दराने खरेदी होत असल्याने शेतकऱ्यांची लूट होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. तुरीला या वर्षी प्रतिक्विंटल ४,६२५ रुपये दर जाहीर करण्यात आला असून, ४२५ रुपये बोनस दिला जाणार आहे, परंतु बाजारात हमीदरापेक्षा कमी दराने तूर खरेदी केली जात असल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांकडून झाल्याने शासनाने नाफेडमार्फत खरेदी सुरू केली, परंतु तूर खरेदी करताना नाफेड प्रतवारीचे निकष लावत आहे. परिणामी, शेतकऱ्यांना बाजारात तूर विकण्यावाचून पर्याय नसल्याने शेतकऱ्यांची मात्र लूट होत आहे.दर स्थिरता निधी योजनेंतर्गत २०१६-१७ या वर्षासााठी हमीदर निश्चित करण्यात आले आहेत. शेतकऱ्यांना तूर विक्रीवर प्रतिक्विंटल ४२५ रुपये दर दिले जाणार आहेत. हमीदर व बोनस मिळून शेतकऱ्यांना ५०५० रुपये प्रतिक्विंटल मिळणार आहेत; पण शेतकरी नाफेडला तूर देतच नसल्याने शेतकऱ्यांना बोनसला मुकावे लागणार आहे. नाफेड एफएक्यू प्रतीच्या तुरीला हे दर देणार आहे. यावर्षी तूर विक्रीची रोकड थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे. सोमवार आठवड्यातील पहिला दिवस होता. सोमवारी अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तुरीचे सरासरी प्रतिक्विंटल ४,३१० रुपये दर आहेत. प्रत्यक्षात कमीत कमी ४,००० रुपये प्रतिक्विंटल दरानेच खरेदी केली जात आहे. राज्यातील लातूर ही तुरीची मोठी बाजारपेठ आहे. तेथेही हीच स्थिती आहे.मागील वर्षी ९ ते १० हजार रुपये प्रतिक्विंटलपर्यंत तुरीचे दर होते. उपलब्ध आकडेवारीच्या विश्लेषणावरू न यावर्षी ५ ,८०० ते ६,५०० रुपये प्रतिक्विंटल राहण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तविली होती, हे विशेष. (प्रतिनिधी)