शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी-अधिकाऱ्यांत उमरगा शाखेत खडाजंगी

By admin | Updated: June 13, 2016 23:33 IST

उमरगा / परंडा : पीकविम्याची रक्कम कर्जखात्यात वर्ग करून घेण्यात येत असल्याने संतापलेल्या शेतकऱ्यांनी जिल्हा बँकेतील अधिकाऱ्यांना घेराओ घातला़ ही घटना सोमवारी

पीकविमा : परंड्यात चलन तुटवड्यामुळे संतापउमरगा / परंडा : पीकविम्याची रक्कम कर्जखात्यात वर्ग करून घेण्यात येत असल्याने संतापलेल्या शेतकऱ्यांनी जिल्हा बँकेतील अधिकाऱ्यांना घेराओ घातला़ ही घटना सोमवारी दुपारी उमरगा येथील जिल्हा बँकेच्या शाखेत घडली असून, या घटनेने काही काळ तणाव निर्माण झाला होता़ तर परंडा ‘डीसीसी’ शाखेत चलनतुटवड्यामुळे अनेकांना रिकाम्या हाती परतावे लागत होते़ तर अनेकांना तासंतास बँकेत ताटकळत थांबावे लागत आहे़उमरगा शहरातील छत्रपती शिवाजी महाविद्यालयाच्या शेजारील जिल्हा बँकेच्या शाखेतून सोमवारी सकाळी पीकविमा रकमेचे वाटप सुरू करण्यात आले होते़ पैसे उचलण्यासाठी येणाऱ्या काही लाभार्थ्यांच्या खात्यावरून २०० रूपये कपात करून घेण्यात येत होते़ ही प्रक्रिया सकाळपासूनच सुरू होती़ पैसे कपात करण्यात येत असल्याने शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त होत होता़ त्याचवेळी प्रवीण चव्हाण या शेतकऱ्याच्या खात्यावरीलही २०० रूपये कपात केल्याचे समोर आले. यामुळे संतापलेल्या चव्हाण यांनी अधिकारी, कर्मचाऱ्यांना याचा जाब विचारला़ यावेळी इतर शेतकऱ्यांनीही पैशांची कपात करू नये, अशी मागणी लावून धरत बँकेचे कामकाज बंद पाडले़ त्यावेळी ज्येष्ठ तपासणीस दिलीप जगताप यांनी शेतकरी चव्हाण यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला़ त्यावेळी संतापलेल्या शेतकऱ्यांनी त्यांनाही घेराओ घालून प्रश्नांचा भडीमार सुरू केला़ बँकेतील गोंधळ वाढल्यानंतर गुगळगावचे माजी सरपंच गोविंद तळभोगे व इतरांनी बँकेचे चेअरमन सुरेश बिराजदार यांच्याकडे याबाबत तक्रार दिली़ त्यानंतर चेअरमन बिराजदार यांनी शेतकऱ्यांची रक्कम कपात करू नये, अशा सूचना दिल्यानंतर बँकेतील तणाव निवळला़परंडा शहरातील जिल्हा बँकेच्या शाखेला हैद्राबाद ट्रेझरीतून पीकविम्याची रक्कम वाटप करण्यात येते़ मागील दोनच दिवसांपूर्वी भाजपाचे आ़ सुजितसिंह ठाकूर, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष कैलास शिंदे यांनी मोठा गाजावाजा करीत पीकविमा रक्कमेचे वाटप सुरू केले होते़ त्यावेळी पीकविम्याची रक्कम नियोजनबध्द व वेळेत शेतकऱ्यांना वाटप करण्याच्या सूचना दिल्या होत्या़ बँकेने अ, ब, क, ड पध्दतीने गावनिहाय नियोजन करून पीकविमा वाटपाला प्रारंभ केला होता़ मात्र, सोमवारी हैद्राबाद बँकेकडून अपुऱ्या प्रमाणात चलन तुटवडा झाला़ ग्रामीण भागातील इतर शाखांमध्येही चलन तुटवड्याचा प्रश्न उद्भवला होता़ पेरणीसाठी पैसा आवश्यक असल्याने शेतकरी सकाळपासूनच बँकेत उभा होते़ मात्र, चलन तुटवडा झाल्याने शेतकऱ्यांची गैरसोय होत होती़ परिणामी शेतकऱ्यांमध्ये तणाव निर्माण होवून, संताप व्यक्त केला जात होता़ शेवटी आ़ सुजितसिंह ठाकूर यांनी हैद्राबाद बँकेतील अधिकारी, व जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधून चलन तुटवड्याचा प्रश्न मार्गी लावत यापुढील काळात चलनतुटवडा होवू नये, अशा सूचना संबंधितांना दिल्या़ त्यानंतर पीकविम्याचे वाटप करण्यात आले़ (वार्ताहर)