शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांची शेडनेट शेतीकडे वाटचाल

By admin | Updated: February 3, 2017 21:31 IST

शेतात आधुनिक प्रयोग करण्याचे धाडस शेतकरी करीत नसल्याने उत्पादनातही वाढ होत नाही

ऑनलाइन लोकमत/ ब्रह्मानंद जाधवबुलडाणा, दि. 3 -  शेतात आधुनिक प्रयोग करण्याचे धाडस शेतकरी करीत नसल्याने उत्पादनातही वाढ होत नाही; मात्र जिल्ह्यातील शेतकऱ्यांची शेडनेट शेतीकडे वाटचाल होत असून पारंपरिक शेतीला फाटा देत मिरची, वांगे, टोमॅटो व टरबुज लागवड करून कमी कालावधीत लाखोंचे उत्पादन घेण्याचे तंत्र शेडनेट शेतीच्या माध्यमातून रुळत आहे. जिल्ह्यात ११७ शेडनेट असून, ६ हरितगृह आहेत. शेडनेटमुळे हजारो मजूरांना रोजगार उपलब्ध होत आहे.  प्रत्येक वर्षी तेच पीक व त्यावर खतांबरोबर विविध प्रकारच्या औषधांचा मारा यामुळे शेतीचा कस कमी होऊन शेतातील उत्पादनही कमी होत चालले आहे. त्यामुळे शेतामध्ये नवनवीन तंत्रज्ञान अवलंबल्यास उत्पादनात वाढ होऊन शेतकऱ्यांचा विकास साधला जाऊ शकतो. शेतात आधुनीकीकरणाची गरज लक्षात घेऊन जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांनी शेडनेट शेतीकडे वाटचाल केली आहे. जिल्ह्यातील मेहकर, लोणार, सिंदखेड राजा या तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेडनेट शेतीचा प्रयोग यशस्वी केला आहे. लोणार तालुक्यातील  मातमळ  व मेहकर तालुक्यातील परतापूर शिवारात मिरची, वांगे, टोमॅटोची शेडनेट शेतीद्वारे लागवड करण्यात आली आहे. जिल्ह्यात सध्या ११७ शेडनेट असून, ६ हरितगृह आहेत. शेडनेटसाठी लागलेला एकूण खर्चाच्या ५० टक्के अनुदान कृषी विभागाकडून देण्यात येते. शेडनेट शेतीद्वारे शेतकऱ्यांना कमी कालावधीत चांगल्या प्रकारचे उत्पादन झाल्याने काही शेतकऱ्यांनी शेतातच बिजोत्पादन प्रकल्प सुरू केला. मेहकर तालुक्यातील परतापूर शिवारातील शेडनेटची शेती पाहण्यासाठी अनेक शेतकरी येत आहेत. कमी कालावधीत लाखोचे उत्पन्न पाहूण अनेक शेतकऱ्यांनी शेडनेट शेती उभारण्यास सुरूवात केली आहे. जिल्ह्यात शेडनेट शेती करण्याचे प्रमाण वाढत असल्याने हजारो मजुरांना रोजगार उपलब्ध झाला आहे. ८४ शेडनेट तर ११ हरितगृह मंजूरशेतीचा प्रयोग मेहकर, लोणार व सिंदखेड राजा तालुक्यात चांगलाच रुळला आहे. दुष्काळावर मात करीत शेतकरी लाखो रुपयांचे उत्पादन शेडनेट शेतीतून घेत आहेत. जिल्ह्यात ८४ शेडनेट व ११ हरितगृह मंजूर आहेत. यासाठी शेडनेटसाठी लागलेल्या खर्चाच्या ५० टक्के अनुदान कृषी विभागाकडून देण्यात येते. महिलांना मिळाला रोजगार मिरची, टोमॅटो व टरबुज आदीचे उत्पादन शेतकरी शेडनेट शेतीद्वारे घेत आहेत. एका वेळेला २० ते २५ मजूर एका शेडनेट शेतीमध्ये काम करीत आहेत. परिसरातील हजारो मजुरांच्या हाताला काम मिळत असल्याने मजुरांच्या चेहऱ्यावरह समाधान पाहावयास मिळत आहे. अनेक मजूरांना शेडनेट शेतीमुळे नियमीत रोजगार उपलब्ध झाला असून यामध्ये महिला मजूरांचा मोठ्याप्रमाणावर समावेश आहे.