शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांकडून दूध-भाजीपाल्याची कोंडी?

By admin | Updated: May 29, 2017 03:59 IST

जूनपासूनच्या शेतकरी संपाच्या मोर्चे बांधणीला वेग आला असून दूध-भाजीपाल्याची वाहतूक करणारी वाहने रोखली जाणार आहेत

लोकमत न्यूज नेटवर्कअहमदनगर : 1 जूनपासूनच्या शेतकरी संपाच्या मोर्चे बांधणीला वेग आला असून दूध-भाजीपाल्याची वाहतूक करणारी वाहने रोखली जाणार आहेत. त्यासाठी महामार्गावर ठिकठिकाणी चौक्या उभारण्याचे काम हाती घेण्यात आले आहे़ ठिकठिकाणच्या शेतकऱ्यांनी दूध- भाजीपाल्याची विक्री न करण्याचा निर्णय घेतला आहे़ अहमदनगरसह नाशिक, पुणे, औरंगाबाद, जालना, बीड, परभणी, नांदेड आदी जिल्ह्यांत संपाचे नियोजन वेगाने सुरू आहे़ किसान क्रांतीच्या समन्वयकांसह विविध संघटना त्यांना मदत करत आहेत़ महामार्गावरील गावांतील शेतकरी ठिकठिकाणी चौक्या उभारण्यात व्यस्त आहेत़, अशी माहिती किसान क्रांती समन्वयक धनंजय धोरडे यांनी दिली. महानगरांच्या आधीच्या गावात दूध-भाजीपाल्याची वाहने अडवली जातील.शेतकऱ्यांच्या संपाला ३३ संघटनांनी पाठिंबा जाहीर केला आहे़ शेतकरी संघटनेने संप यशस्वी करण्यासाठी जिल्हानिहाय बैठका घेवून नियोजन केले आहे. नगर जिल्ह्यात शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अनिल घनवट, नाशिक जिल्ह्यात योगेश रायते, पुणे जिल्ह्यात शांताराम कुंजीर मराठवाड्यासह विदर्भात अन्नदाता संघटनेने जयाजीराव सूर्यवंशी मोर्चेबांधणी करत आहेत, असेही धोरडे म्हणाले. कृषी उत्पन्न बाजार समित्यांसह दूधसंघही बंद ठेवण्याबाबत संबंधितांशी चर्चा सुरू आहे.अनेकांचा पाठिंबासकल मराठा समाजाच्या समन्वय समितीच्या मुंबई येथे झालेल्या बैठकीत शेतकऱ्यांच्या संपाला सक्रिय पाठिंबा देण्याचा निर्णय झाल्याची माहिती शिवप्रहार संघटनेचे अध्यक्ष संजीव भोर यांनी पुणतांबा येथे सुरू असलेल्या आंदोलनात दिली़ कमलाकार कोते यांनी ५०० शेतकऱ्यांच्या भोजनाची व्यवस्था केली आहे. हमाल पंचायत संघटनेचे डॉ़ बाबा आढाव यांनी रविवारी पुणतांबा येथे सुरू असलेल्या आंदोलनस्थळी भेट देऊन आंदोलनात आम्ही सक्रिय राहू, असे सांगितले.