शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांची १०० क्विंटल तूर पावसात भिजली

By admin | Updated: June 5, 2017 04:53 IST

केंद्राबाहेर रांगेत असलेल्या १४० वाहनांपैकी दोन वाहनांमधील सुमारे १०० क्विंटल तूर शनिवारी रात्री झालेल्या पावसात भिजली

लोकमत न्यूज नेटवर्कगंगाखेड (जि. परभणी) : येथील शासकीय तूर खरेदी केंद्राबाहेर रांगेत असलेल्या १४० वाहनांपैकी दोन वाहनांमधील सुमारे १०० क्विंटल तूर शनिवारी रात्री झालेल्या पावसात भिजली. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर नवीन संकट उभे टाकले आहे. रविवारी तूर वाळविण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ झाली.गंगाखेडच्या तूर खरेदी केंद्रावर गंगाखेड, पालम आणि सोनपेठ या तीन तालुक्यांतील ६३८ शेतकऱ्यांनी नोंदणी केली असून त्यापैकी ५१० शेतकऱ्यांना तूर खरेदीचे टोकन मिळाले आहे. काटा सुरु असल्याने १८९ वाहने खरेदी केंद्राबाहेर रांगेत उभी होती. ४० वाहनांमधील तूर खरेदी करण्यात आली. परंतु, १ जूनपासून हे केंद्र बंद झाले आहे. केंद्र सुरु करण्याचे आदेश लवकरच प्राप्त होतील, या आशेने ३०० शेतकऱ्यांनी १४० वाहने रांगेतच उभी केली आहेत. शुक्रवारी जोरदार पाऊस झाला. मात्र कुठलेही आच्छादन नसल्याने दोन वाहनांतील सुमारे १०० क्विंटल तूर भिजली. ३१ मेपर्यंतच तूर खरेदी करण्याचे आदेश शासनाने दिले होते. पुढील आदेश नसल्याने तुरीचा काटा बंद आहे, असे दुय्यम निबंधक बी. बी. राठोड व खरेदी -विक्री संघाचे व्यवस्थापक लक्ष्मण भोसले यांनी सांगितले.