शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांनी पेटविली मोसंबीची बाग

By admin | Updated: April 23, 2016 04:02 IST

गेली चार-पाच वर्षे दुष्काळाने पाठ सोडलेली नाही, त्यामुळे सर्वस्व पणाला लावून जगविलेल्या मोसंबीच्या बागा पाण्याविना जळून जात आहेत

कचनेर (जि. औरंगाबाद) : गेली चार-पाच वर्षे दुष्काळाने पाठ सोडलेली नाही, त्यामुळे सर्वस्व पणाला लावून जगविलेल्या मोसंबीच्या बागा पाण्याविना जळून जात आहेत. त्यात सरकारने फळबागांना काहीही मदत न करण्याचे धोरण निश्चित केल्याने ३५० झाडांची मोसंबीची बाग शेतकऱ्यांनी स्वत: पेटवून दिली. आघाडी सरकारने केलेल्या मदतीमुळे गेली तीन-चार वर्षे कशाबशा वाचलेल्या हजारो एकर बागा आता पाण्याअभावी जळून जात आहेत. फळबाग वाचविण्यासाठी केंद्र व राज्य सरकारकडे आर्थिक पॅकेजची मागणी करूनसुद्धा पदरी काहीही पडलेले नाही. त्यामुळे शुक्रवारी पोरगाव चौफुलीजवळील किसन रावसाहेब गायकवाड यांच्या शेतातील मोसंबीची ३५० झाडे जाळून तीव्र निषेध नोंदवण्यात आला. पाण्याअभावी सुकलेली ३५० झाडे या आंदोलनात जाळून टाकण्यात आली.> कधी येणार पंतप्रधानांचे पथक : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठवाड्यासह इतर राज्यातील दुष्काळाची पाहणी करण्यासाठी तातडीने विशेष पथक पाठविण्याची घोषणा करून १५ दिवस उलटले आहेत; परंतु अद्यापही पथक आले नाही. हे पथक कधी येणार? सरकारला माहिती कधी सादर करणार? तोपर्यंत या फळबागा वाचतील काय? शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबतील काय, असे अनेक प्रश्न जयाजी सूर्यवंशी यांनी उपस्थित केले. > लेकरापेक्षाही अधिक जीव आम्ही या बागांना लावला. लेकरांच्या तोंडातील घास काढून बागा वाढविल्या. मागील चार वर्षे दुष्काळ व सततची पाणीटंचाई, त्यामुळे बेताचेच उत्पादन झाले. उत्पादन खर्चही भागला नाही. डोक्यावरील कर्ज वाढते आहे. दररोज सरपण होत जाणारी बाग पाहून तीळतीळ मरण्यापेक्षा टाकली एकदाची जाळून. एक दिवस रडून गप्प बसता येईल. - किसन गायकवाड