शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
2
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
3
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
4
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
5
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
6
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
7
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
8
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
9
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
10
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
11
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
12
Astro Tips: आंघोळीच्या पाण्यात १ वेलची टाकल्याने होणारे लाभ वाचून चकित व्हाल!
13
Jara Hatke: कचरा फेकू नका, विकून पैसे मिळवा! 'या' ॲपची देशभर चर्चा; नेमका प्रकार काय?
14
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
15
मस्तच! हात लावताच समजणार संत्र गोड की आंबट? आई-आजीलाही माहीत नसेल ही सुपर ट्रिक
16
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
17
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
18
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
19
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
20
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांचे मोर्चे, बंदने पालघर दणाणला

By admin | Updated: June 7, 2017 03:46 IST

संपूर्ण राज्यभर रस्त्यावर उतरलेल्या शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ पालघर, जव्हार, डहाणू, वाडा येथे निघालेल्या मोर्चांना उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला

आपल्या विविध मागण्यांसाठी संपूर्ण राज्यभर रस्त्यावर उतरलेल्या शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ पालघर, जव्हार, डहाणू, वाडा येथे निघालेल्या मोर्चांना उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला तर विक्रमगडमध्ये पुकारलेला बंदही कडकडीत पाळला गेला. त्याचे आयोजन किसानसभा आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने केले होते. याकाळात कोणताही अनुचित प्रकार घडला नसला तरी त्याचा फटका हातावर पोट असणाऱ्या गोर-गरीबांनाच जास्ती बसला.लोकमत न्यूज नेटवर्कडहाणू : महाराष्ट्रातील विविध शेतकरी संघटनांच्यावतीने आपल्या मागण्यांसाठी सुरू केलेल्या संपाला पाठिंबा देण्याकरीता मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने मंगळवारी पुकारलेल्या बंदला डहाणू शहरात संमिश्र प्रतिसाद लाभला, तर बाजारपेठेत कडकडीत बंद पाळला.सागरनाका येथे माकपच्या कार्यकर्त्यांनी भाजप सरकार विरोधात निदर्शेने केली. एडवर्ड वरठा, एल.बी.धनगर, विनोद निकोले यांनी भाषणे केली. महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांचे कर्ज सरसकट माफ करून, अन्य अत्यावश्यक मागण्या त्वरीत मान्य कराव्यात ही मागणी करण्यात आली. सकाळी इराणी रोड, थर्मल पॉवर रोडवर काही भागात दुकाने सुरू करण्यात आली होती. मात्र माकपच्या कार्यकर्त्यांनी दुकाने बंद केली. यावेळी रडका कलांगडा व एल बी. धनगर, विनोद निकोले, लहानी दौडा, चंद्रकांत घोरखना, चंदू कोम, मेरी रावते चंद्रकांत वरठा, रामदास सुतार, कमल वानले, दत्तू दुमाडा, यशवंत कडू आदिंनी प्रांत अधिकाऱ्यांना निवेदन दिल्यानंतर मोर्चा विसर्जित झाला.>कर्जमाफीसाठी किसान सभेचा मोर्चावाडा: शेतकर्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळावी या प्रमुख मागणीकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी व शेतकरी संपाला पाठिंबा दर्शविण्यासाठी किसान सभेच्यावतीने आज तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढून सरकारचा निषेध करण्यात आला. खंडेश्वरी नाका येथून मोर्चा काढण्यात आला.तो शहरातील प्रमुख रस्त्यांवरून नेण्यात आला. त्यानंतर त्याचे रुपांतर तहसीलदार कार्यालयासमोर सभेत करण्यात झाले. यावेळी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणा बाजी करण्यात आली. या मोर्चाचे नेतृत्व किसान सभेचे वाडा तालुका अध्यक्ष सुनिल पाटील व कम्युनिस्ट पक्षाचे नेते सुनील धानवा यांनी केले होते. त्याला शेतकरी व शेतमजूरांनी उत्स्फूर्त पाठिंबा दिला. मोर्चामुळे वाहतूकीचा खोळंबा झाला होता.शेतकर्यांचा ७/१२ कोरा करा, स्वामिनाथन शिफारशी लागू करा, शेतीसाठी बिनव्याजी कर्जपुरवठा करा, शेतकरी शेतमजूर यांना वयाच्या ६० वर्षानंतर पेन्शन द्या, दुधाला प्रतिलिटर ५० रूपये भाव द्या, ठिबक, तुषार सिंचनासाठी १०० टक्के अनुदान द्या, शेतकऱ्यांच्या जमिनी जबरदस्तीने अतिग्रहित करणारे समृद्धी महामार्ग, बुलेट ट्रेन, दिल्ली कॉरिडोर मार्ग हे प्रकल्प रद्द करावेत यामागण्याक करण्यात आल्या.जव्हार प्रांत कार्यालयावर शेतकऱ्यांची निदर्शनेजव्हार : शेतकऱ्यांना पाठींबा देण्यासाठी मार्क्सवादी कम्युनिष्ट पक्षाच्या नेतृवाखाली जव्हार तालुक्यातील माकपाच्या शेकडो कार्यक्रत्यांनी मंगळवारी प्रांत कार्यालयावर निदर्शने करून केंद्र व राज्यातील भाजप सरकारवर टीकेची झोड उठविली. उपविभागीय अधिकारी पवनीत कौर यांना निवेदन दिले. पिकांना हमी भाव द्या, शेतकऱ्यांची सरकारकडून होणारी पिळवणूक थांबवा, पिक कर्ज माफ करा, अशा मागण्यांसाठी रस्त्यावर उतरलेल्या शेतकऱ्यांना पाठींबा म्हणून ही निदर्शने झाली. जि. प.सदस्य रतन बुधर, पं.स. सदस्य लक्ष्मण जाधव, तसेच यशवंत बुधर, विजय शिंदे, शांतीबाई खुरकुटे आदींनी नेतृत्व केले.>विक्र मगडमधे कडकडीत बंद, व्यापाऱ्यांचाही पाठिंबाविक्रमगड : शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठीच्या आंदोलनाचा पुढील टप्पा म्हणून कम्युनिस्टांनी पुकारलेला बंद कडकडीत झाला. त्याला व्यापारी असोशिएशन आणि राष्ट्रवादीने पाठिंबा दिल्याने बाजार पेठ सकाळपासून पूर्णपणे बंद होती. याचा फटका पावसाळापूर्व खरेदी करणाऱ्या नागरीकांना बसला आहे. शेतकऱ्यांना कर्ज माफी, उत्पादन खर्चावर आधारित भाव, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करा, अशा विविध मागण्यांसाठी हा बंद होता. मोर्चा काढून तहसिल कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. सोमवारच्या बंदमुळे आधीच त्रस्त झालेल्या जनतेच्या कष्टात या बंदमुळे आणखीनच भर पडली. हातावर पोट असणाऱ्यांची रोजीरोटी तर सलग दुसऱ्या दिवशी बुडाली.या बंदमुळे बाजारपठेतील खरेदी-विक्र ी व्यवहार पूर्णपणे मंदावला होता. याचा फटका पावसाळा जवळ आल्याने पावसाळापूर्व खरेदी करणाऱ्या ग्राहकाना बसला असून दूरवरून खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांना रिकाम्या हाती परत जावे लागले.या बंदचा काळात पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवल्याने कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही. या वेळी शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांचे निवेदन तहसिलदार सुरेश सोनवणे यांना देण्यात आले.