शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

समन्वय समितीकडूनच शेतकऱ्यांची फरफट

By admin | Updated: June 4, 2017 00:58 IST

शेतकरी आंदोलनाच्या समन्वय समितीतील काँग्रेस व भाजपाच्या समर्थकांनी विसंगत व धरसोड भूमिका घेतल्यामुळे फरफट झाल्याची शेतकऱ्यांची

- सुधीर लंके। लोकमत न्यूज नेटवर्क

अहमदनगर : शेतकरी आंदोलनाच्या समन्वय समितीतील काँग्रेस व भाजपाच्या समर्थकांनी विसंगत व धरसोड भूमिका घेतल्यामुळे फरफट झाल्याची शेतकऱ्यांची भावना असून, ही समन्वय समिती कोणी निवडली? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. पुणतांबा ग्रामस्थांनी ३ एप्रिलला संपाचा इशारा दिल्यानंतर समन्वय समितीची स्थापना झाली. त्यात डॉ. धनंजय धनवटे, धनंजय जाधव व धनंजय धोरडे हे स्थानिक नेते सक्रिय होते. नंतर औरंगाबाद जिल्ह्यातील जयाजीराव सूर्यवंशीही सामील झाले. मात्र विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांच्या उपस्थितीत १६ मे रोजी मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत संप स्थगित करण्यात येत असल्याची घोषणा केली. शुक्रवारी रात्री जयाजीराव सूर्यवंशी, जाधव यांनी धनवटे यांच्याच धर्तीवर मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेऊन संप मागे घेत असल्याची घोषणा केली. समन्वय समितीतच दोन गट आहेत.सूर्यवंशी, गिड्डे यांची खेळी आंदोलनाच्या कृती समितीत एकूण २१ सदस्यांचा समावेश आहे. मात्र, हे सर्व सदस्य मुख्यमंत्र्यांसोबतच्या चर्चेला उपस्थित नव्हते. २१ सदस्यांची निवड कुणी व कशी केली? हाच प्रश्न आता उपस्थित झाला आहे. संदीप गिड्डे व सूर्यवंशी यांनी महत्त्वाची भूमिका बजावल्याचा आरोप डॉ. अजित नवले यांनी केला आहे.