शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

दानपेट्यांपेक्षा शेतकऱ्यांची कुटुंबे महत्त्वाची

By admin | Updated: August 10, 2015 00:57 IST

राज्यातील शेतकरी आत्महत्यांच्या घटना दुर्दैवी असून, बिकट परिस्थितीत पीडित कुटुंबांना मदतीची गरज आहे. देवळातील दानपेट्यांमध्ये पैसे टाकण्यापेक्षा आत्महत्या केलेल्या

बीड : राज्यातील शेतकरी आत्महत्यांच्या घटना दुर्दैवी असून, बिकट परिस्थितीत पीडित कुटुंबांना मदतीची गरज आहे. देवळातील दानपेट्यांमध्ये पैसे टाकण्यापेक्षा आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांची कुटुंबे व त्यांचा अस्ताव्यस्त झालेला संसार सावरण्यासाठी त्यांना आर्थिक मदतीची अधिक गरज आहे. त्यासाठी दानशूर व्यक्तींनी पुढे यावे, असे आवाहन ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी केले. नानांनी बीड जिल्ह्यातील आत्महत्या केलेल्या ११२ शेतकऱ्यांच्या कुटुंबांना प्रत्येकी १५ हजार रुपयांची आर्थिक मदत तर केलीच; शिवाय त्यांचे मनोधैर्यही वाढविले. बीडचा भूमिपुत्र व अभिनेते मकरंद अनासपुरे तसेच लेखक अरविंद जगताप, नितीन नेरुळकर, अमोल अंकुटे यांच्या प्रयत्नातून हा कार्यक्रम झाला. नाना म्हणाले, माणसातल्या संवेदना जागृत करण्याचे मोठे आव्हान आज आमच्यापुढे उभे ठाकले आहे. मी येथे केवळ कार्यक्रमाला आलो नसून पीडित शेतकरी कुटुंबांसाठी काय करता येईल, यासाठी आलो आहे. सरकार मदत देईल तेव्हा देईल, पण मी माझ्या क्षमतेनुसार त्यांना मदतीचा हात देत आहे. पुस्तकांपेक्षा माणसं वाचायची सवय प्रत्येक व्यक्तीला असणे आवश्यक आहे. आपण प्रत्येक जण त्यांच्यासाठी काहीतरी करू शकतो, असेही पाटेकर यांनी सांगितले. प्रत्येकात प्रचंड शक्ती सामावलेली आहे. ती ओळखण्याची दृष्टी शेतकऱ्यांनी ठेवावी. यापुढे आत्महत्येसारखे मार्ग सोडून द्यावे असे आवाहन नाना यांनी केले. माणसात परमेश्वर बघा, केवळ महापुरुषांची नावे घेऊन कोट्यवधी रुपये गोळा करणारी अनेक माणसे आहेत. मात्र ते समाजासाठी काहीही करत नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांचे जगणे सुसह्य करण्यासाठी चळवळी उभारणे आवश्यक आहे. जोपर्यंत नानांसारखी माणसं समाजात आहेत, तोपर्यंत शेतकऱ्यांना आत्महत्येसारखा पर्याय निवडण्याची गरज नाही, असे मकरंद अनासपुरे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)