शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना वीजबिल माफी नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2017 02:47 IST

राज्यातील ४० लाख शेतकऱ्यांकडे तब्बल १८ हजार कोटी रुपयांची वीजबिल थकबाकी आहे. यातील सात हजार कोटी रुपयांची वीजपंपांची थकबाकी पश्चिम महाराष्ट्रातील असून

पुणे : राज्यातील ४० लाख शेतकऱ्यांकडे तब्बल १८ हजार कोटी रुपयांची वीजबिल थकबाकी आहे. यातील सात हजार कोटी रुपयांची वीजपंपांची थकबाकी पश्चिम महाराष्ट्रातील असून, बडे शेतकरी, बागायतदार आणि निर्यातदारही वीज बिले भरायला तयार नाहीत असे सांगून शेतकऱ्यांना वीजबिल माफी देता येणार नाही, असे ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुरुवारी येथे पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. शेतकऱ्यांच्या वीज थकबाकीवरील दंड, व्याज माफ करण्यात येणार आहे. त्यांना पाच टप्प्यात दर तीन महिन्यांनी ही थकबाकी भरता येईल, याचा लाभ घेऊन शेतकऱ्यांनी थकबाकी भरावी, असे आवाहनही त्यांनी केले.विजेची निर्मिती, पुरवठा यासाठी प्रती युनिट सहा रुपये खर्च येतो. मात्र, शेतकऱ्यांना शेतीसाठी हीच वीज १ रुपया २० पैशांनी पुरवण्यात येते. एका युनिटमागे पाच रुपयांची सूट देऊनही राज्यात जवळपास ४० लाख शेतकऱ्यांनी १८ हजार कोटी रुपये थकवले आहेत. त्यातील मूळ रक्कम १५ हजार कोटींची असून ३ हजार कोटी रुपयांचे दंड व्याज आहे. शासनाने हे दंड व्याज रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, मूळ थकबाकीची रक्कम भरावी लागणार आहे, असे बावनकुळे यांनी स्पष्ट केले.ज्या जिल्ह्यातील अथवा गावांमधील वसुली होईल त्या पैशांमधून या गावांमध्ये नवीन कनेक्शन आणि नवीन कामे केली जाणार आहेत. थकबाकीची ही रक्कम वसूल करण्यासाठी गावागावात मेळावे घेण्यात येणार आहेत. स्थानिक आमदार, लोकप्रतिनिधींनी हे मेळावे घ्यावेत, असे आवाहन बावनकुळे यांनी केले. (प्रतिनिधी)वंचित १९ लाख कुटुंबाना वीज पुरवणार राज्यातील तब्बल १९ लाख कुटुंबापर्यंत अद्यापही वीज पोचलेली नाही. त्या कुटुंबांना २०१९ पर्यंत वीज देण्याची योजना आखण्यात आली आहे. यासोबतच आगामी काळात शेतकऱ्यांच्या मागणीनुसार बारा तासापर्यंत वीज देण्याचा प्रयत्न करणार आहे.- चंद्रशेखर बावनकुळे, ऊर्जामंत्री-महाराष्ट्र सरकार