शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी कर्जमाफीचा अध्यादेश जारी

By admin | Updated: June 28, 2017 18:20 IST

कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी ३४ हजार कोटी रुपयांच्या कर्जमाफीची घोषणा केल्यानंतर राज्य सरकारकडून

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २८ - कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी ३४ हजार कोटी रुपयांच्या कर्जमाफीची घोषणा केल्यानंतर राज्य सरकारकडून आज या कर्जमाफीसंबंधीचा अध्यादेश जारी करण्यात आला आहे. या अध्यादेशानुसार राज्यातील शेतकऱ्यांचे सुमारे दीड लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ होणार आहे. त्यासाठी एकूण ३४ हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे.  तसेच कर्जमाफीसाठी शेतजमिनीच्या मर्यादेचा निकष लावला जाणार नाही, असेही अध्यादेशात स्पष्ट करण्यात आले आहे. 
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी राज्यातील शेतकऱ्यांनी संपावर जाण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे या महिन्याच्या सुरुवातीला राज्यात सरकारविरोधी वातावरण तापले होते. अखेर शेतकऱ्यांच्या दबावासमोर झुकत राज्य सरकारने शेतकऱ्यांची कर्जे माफ करण्याची घोषणा केली होती. मात्र या कर्जमाफीचे निकष आणि कर्जमाफी सरसकट की तत्त्वत: यावरून राज्य सरकार आणि शेतकऱ्यांच्या सुकाणू समितीमध्ये मतभेद झाले होते. अखेर सरकारने सरसकट कर्जमाफी देण्याचे जाहीर केले होते. त्यानुसार आज त्यासंबंधीचा अध्यादेश राज्य सरकारकडून प्रसिद्ध करण्यात आला आहे. या अध्यादेशानुसार राज्यातील शेतकऱ्यांचे ३० जून २०१६ पर्यंतचे दीड लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ होणार आहे. तसेच शेतकऱ्यांच्या एकूण कर्जमाफीचा आकडा हा ३४ हजार कोटी रुपये इतका असेल.  
मात्र कर्जमाफीचा लाभ हा केवळ राष्ट्रीयीकृत बँका, खाजगी बँका, ग्रामीण बँका आणि जिल्हा सहकारी बँकांमधून घेतलेल्या कर्जावर लागू असेल, तसेच ज्या शेतकऱ्यांनी २०१६-१७ या वर्षात कर्ज घेतलेल्या आणि ३० जून २०१७ पर्यंत या कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना २५ टक्के किंवा २५ हजार रुपये यापैकी कमी असेल ती रक्कम देण्यात येईल.