शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे प्रकल्पाच्या भूसंपादनासाठी ‘शासन शेतकऱ्यांच्या दारी’

By admin | Updated: May 6, 2017 03:55 IST

वर्धा-यवतमाळ-नांदेड या महत्त्वाकांक्षी रेल्वेप्रकल्पाचे भूसंपादन वेगाने व्हावे म्हणून शासन मोबदल्यासाठी थेट शेतकऱ्यांच्या

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : वर्धा-यवतमाळ-नांदेड या महत्त्वाकांक्षी रेल्वेप्रकल्पाचे भूसंपादन वेगाने व्हावे म्हणून शासन मोबदल्यासाठी थेट शेतकऱ्यांच्या दारापर्यंत पोहोचले आहे. तीन वर्षांत भूसंपादन पूर्ण करायचे असले तरी कळंब व यवतमाळ या दोन तालुक्यांतील भूसंपादन अवघ्या ११ महिन्यांतच झाले आहे.वर्धा-यवतमाळ-नांदेड या २८४ किलोमीटर रेल्वेमार्गापैकी १८० किलोमीटरचा रेल्वे ट्रॅक एकट्या यवतमाळ जिल्ह्यातून गेला आहे. या मार्गासाठी १२०० हेक्टर जमीन संपादित केली जाणार आहे. या भूसंपादनाची ९१ प्रकरणे असून त्याचे बजेट एक हजार कोटींवर आहे. तीन वर्षांत हे भूसंपादन पूर्ण करायचे आहे.मात्र दोन तालुक्यांत ११ महिन्यातच हे भूसंपादन पूर्ण होत आहे. ९१ पैकी आठ प्रकरणे मार्गी लावून ११८ हेक्टरचे भूसंपादन केले गेले. त्यापोटी शेतकऱ्यांना २६ कोटी २७ लाख रुपये दिले गेले. उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) विजय भाकरे यांनी ‘शासन शेतकऱ्यांच्या दारी’ हा उपक्रम राबवून भूसंपादन प्रक्रियेला गती दिली आहे.  शेतकऱ्यांच्या घरी जाऊन ही प्रक्रिया पूर्ण केली जात आहे. लगेच त्यांच्या बँक खात्यात रक्कम जमा होत आहे.वर्धेची भूसंपादन प्रक्रिया पूर्णया रेल्वेमार्गासाठी वर्धा, वाशिम, नांदेड, हिंगोली या अन्य चार जिल्ह्यांतही भूसंपादन प्रक्रिया सुरू आहे. वर्धेतील ३५ किमीचे भूसंपादन जुन्या कायद्यानुसार पूर्ण झाले आहे. वाशिममध्ये अर्धा किमी, नांदेड ६० किमी तर हिंगोलीतही भूसंपादन करावे लागेल.लोकसुनावणीतून सूट मिळाल्यामुळे भूसंपादन प्रक्रिया वेगाने पूर्ण करणे शक्य होत आहे. कळंब, यवतमाळ तालुक्यातील उर्वरित भूसंपादन महिनाभरात पूर्ण होईल. - विजय भाकरे, उपजिल्हाधिकारी (भूसंपादन), यवतमाळ.