शहरं
Join us  
Trending Stories
1
आता 'टीम इंडिया' पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर आणणार; श्रीकांत शिंदेंसह सुप्रिया सुळेंना जबाबदारी
2
Corona Virus : टेन्शन वाढलं! हाँगकाँग-सिंगापूरमध्ये कोरोनाचं थैमान, रुग्णांमध्ये मोठी वाढ; भारताला किती धोका?
3
UPI Lite, वॉलेट पेमेंट... युजर्सच्या पसंतीस का उतरत नाहीयेत हे नवे फीचर्स? कुठे येतेय समस्या
4
कारगिलमधून बेपत्ता झालेली नागपूरची महिला LOC पार करून पाकिस्तानात पोहचली, कारण...
5
'दृश्यम'पद्धतीने हत्या! प्रेयसीच्या भावाचा मृतदेह पुरला; प्लॅनमध्ये पडला 'मिठा'चा खडा आणि...
6
मुंबई विमानतळ आणि ताज हॉटेलला बॉम्बनं उडवण्याची धमकी; एअरपोर्ट पोलिसांना आला ईमेल
7
Mumbai Local: मुंबईत उद्या ‘मेगा ब्लॉक डे’ मध्य, हार्बर, पश्चिम रेल्वेमार्गावर वाहतुकीत बदल
8
भारताला तुझा अभिमान आहे... पंतप्रधान मोदींनी केलं नीरज चोप्राच्या ऐतिहासिक कामगिरीचं कौतुक
9
Beed Crime News : परळीत तरुणाला बेदम मारहाण! छातीवर बसला, सभोवती कडं केलं, काठ्यांनी बेदम मारहाण, व्हिडीओ व्हायरल
10
Tarot Card: आपल्याजवळ काय नाही, त्यापेक्षा काय आहे, यावर विचार करायला लावणारा आठवडा!
11
गौप्यस्फोट! अटकेआधी संजय राऊतांचा अमित शाहांना फोन; संतापून म्हणाले, "मला अटक करा..."
12
तुर्कस्तान-अझरबैजानसोबत सर्व प्रकारचे व्यवहार संपवणार का सरकार? काय आहे तयारी
13
पाकिस्तानची तिसऱ्या देशाच्या मदतीने भारतात माल निर्यात करण्याची तयारी; सरकारने घेतली दखल
14
उर्वरित IPL 2025 ला आजपासून होणार सुरुवात; मिचेल स्टार्कसह अनेक दिग्गज स्पर्धेतून OUT
15
"भाजपाशी अनैतिक संबंध तोडावेत, जसं 'वर्षा'वर हक्कानं जाता, तसं 'मातोश्री'वर यावं" 
16
पुढच्या वर्षी बंद होणार Vodafone Idea? सरकारकडे मागितली मदत; म्हटलं, 'काम करणं कठीण...'
17
आयुष्याचं ‘सुरक्षा चक्र' आहेत या ३ स्कीम्स, कठीण काळात साथ; कमी कमाई असणारेही करू शकतात गुंतवणूक
18
भारताच्या हल्ल्यात नूर खानसह अनेक एअरबेस उद्ध्वस्त; पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांचा कबुलीनामा
19
आजचे राशीभविष्य १७ मे २०२५ : नोकरदारांना नोकरीत लाभ होईल, जाणून घ्या, कसा असेल आजचा दिवस
20
सुटीत गावी आलेल्या न्यायाधीशांनी स्वत: कापले गावातील मुलांचे केस; नेमकं घडलं काय?

भूमी संपादनाकरिता शेतकऱ्यांची सहमती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2017 04:15 IST

रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी पाचाड गावात, रायगड किल्ला जतन संवर्धन आणि विकास योजनेकरिता आवश्यक १०० एकर जमिनीपैकी आपली ८८ एकर जमीन देण्यास पाचाडमधील शिवप्रेमी शेतकऱ्यांनी विनातक्रार सहमती दिली आहे.

विशेष प्रतिनिधी  अलिबाग : रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी पाचाड गावात, रायगड किल्ला जतन संवर्धन आणि विकास योजनेकरिता आवश्यक १०० एकर जमिनीपैकी आपली ८८ एकर जमीन देण्यास पाचाडमधील शिवप्रेमी शेतकऱ्यांनी विनातक्रार सहमती दिली आहे.या जमिनीची सरकारी संयुक्त मोजणी पूर्ण झाल्याने, पाचाड येथे शिवसृष्टी, हेलिपॅड आणि पर्यटन सुविधा केंद्र उभारण्याच्या कामास आता प्रारंभ होवू शकेल, अशी माहिती रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिली. डॉ. विजय सूयर्वंर्श यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात झालेल्या रायगड किल्ला जतन संवर्धन व परिसर विकास आराखडा आढावा बैठक झाली.देशभरातील ऐतिहासिक गड किल्ल्यांच्या संवर्धन व जतनासाठी ‘रोल मॉडेल’ म्हणून रायगड किल्ल्याचा विकास करण्याचा केंद्र शासनाचा मनोदय असल्याचे खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या २४ डिसेंबर २०१६ रोजी सांगितले होते. प्राथमिक स्तरावर ५०० कोटी रुपये या योजनेला देण्याचे जाहीर केले होते. यासंदर्भात आराखडा ६०६ कोटी रुपयांचा झाला. त्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील शिखर समितीने मान्यता देवून निधी उपलब्ध करून दिला. त्यानुसार ६०६ कोटी रुपयांच्या या योजनेमधील विविध कामांच्या प्रगतीचा सविस्तर आढावा डॉ.सूर्यवंशी यांनी घेतला. या बैठकीस रायगड जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अविनाश गोटे, रायगड किल्ला जतन व संवर्धन योजनेच्या विशेष स्थापत्य पथकाचे अधीक्षक अभियंता जी.एस.मोहिते, एमटीडीसीचे सल्लागार वास्तुविद्या विशारद राहुल समेळ आदी अधिकारी उपस्थित होते.रायगड किल्ला जागतिक वारसाघोषित करण्याचा प्रस्तावकेंद्र शासनाने‘ब’श्रेणी दिलेला रायगड किल्ला ‘अ’श्रेणी स्मारक म्हणून घोषित व्हावा, याकरिता पर्यटन विभागाकडून भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागास प्रस्ताव दिला जावा. तसेच किल्ल्यास ‘जागतिक वारसा स्मारक’ म्हणून घोषित करण्याच्या राज्य शासनाच्या प्रस्तावास भारतीय पुरातत्व विभागाने समर्थन द्यावे. पुरातत्व विभागाकडील एकूण पाच कामांच्या अंदाजपत्रकास मान्यता देण्याबाबत पुरातत्व विभागाच्या अधिकाºयांना डॉ.सूर्यवंशी यांनी आवश्यक त्या सूचना दिल्या. केंद्र शासनाच्या विविध विभागांकडे व नवी दिल्लीच्या भारतीय पुरातत्व विभागाकडे पाठविलेल्या प्रस्तावांबाबत पाठपुरावा करण्याचे आदेश त्यांनी या बैठकीत दिले.तीन दगडी मार्गिकांच्या कामास सप्टेंबरमध्ये प्रारंभरायगड किल्ल्यावरील तीन दगडी मार्गिकांच्या २१ कोटी रुपयांच्या कामास प्रशासकीय मान्यता मिळून ९ कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. त्यानुसार सप्टेंबर २०१७ मध्ये या कामास सुरु वात करण्यात येणार असल्याचे सूयर्वंशी यांनी सांगितले.