शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

पुनर्गठन झालेल्या १० लाख शेतक-यांनाही कर्जमाफी; मुख्यमंत्र्यांनी केली घोषणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2017 05:31 IST

ज्यांच्या कर्जाचे पुनर्गठन झाले आहे अशा शेतक-यांचे दीड लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ केले जाईल, अशी महत्त्वपूर्ण घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत केली.

विशेष प्रतिनिधी मुंबई : ज्यांच्या कर्जाचे पुनर्गठन झाले आहे अशा शेतक-यांचे दीड लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ केले जाईल, अशी महत्त्वपूर्ण घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत केली. या निर्णयाचा फायदा सुमारे १० लाख शेतकºयांना होईल आणि त्यापोटी राज्याच्या तिजोरीवर ६ ते ७ हजार कोटी रुपयांचा अतिरिक्त बोजा पडेल, असा अंदाज आहे.कर्जमाफीच्या निर्णयाबद्दल सरकारचे अभिनंदन करणाºया सत्तारूढ पक्षाच्या ठरावावरील चर्चेला मुख्यमंत्री उत्तर देत होते. या चर्चेत विरोधकांनी कर्जमाफीवरून सरकारवर टीका केली होती. शेतकरी त्यांच्याकडील कर्ज एकाचवेळी फेडू शकत नाहीत म्हणून त्यांना हप्तेपाडून देत कर्जाचे पुनर्गठन केले जाते. त्यांच्या पीककर्जाचे मुदत कर्जात रुपांतर केले जाते. त्यातील एक दोन हप्ते भरलेले शेतकरी हे बँकेच्या रेकॉर्डवर ते थकबाकीदार नसतात. त्यांना नवीन कर्जदेखील मिळते. ते थकबाकीदार नसल्याने सरकारने अलिकडे जाहीर केलेल्या कर्जमाफीचा फायदा त्यांना झालेला नव्हता. मुख्यमंत्र्यांच्या आजच्या घोषणेने त्यांना दीड लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी मिळणार आहे. कर्जमाफी देण्यासंबंधीची संपूर्ण प्रक्रिया आॅगस्टअखेर पूर्ण केली आणि प्रत्यक्ष कर्जमाफीचा लाभ सप्टेंबरपासून दिला जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी विधान परिषदेत सांगितले.कर्जमाफी देताना शेतजमिनीची मर्यादा सरकारने ठेवलेली नाही तथापि, राज्यातील सर्वच शेतकºयांना सरसकट कर्जमाफी दिली जाणार नाही. तसे केले तर १ लाख २० हजार कोटी रुपयांची तरतूद करावी लागेल. सरकारच्या मर्यादा लक्षात घेता ते शक्य नाही, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.छत्रपती शिवरायांच्या नावे योजनासरकारचा जीआर म्हणजे गीता, बायबल, कुराण नाही की जे ईश्वराशिवाय कुणालाच बदलता येत नाही. सरकारसाठी शेतकरीच ईश्वर असल्याने त्याच्या हितासाठी जीआर वेळोवेळी सुधारण्यात काहीही गैर नाही. छत्रपती शिवरायांच्या नावे कर्जमाफीची योजना आणली आहे. सर्व मिळून ती यशस्वी करू या.- देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री(कर्जमाफीचे जीआर सरकारने वारंवार बदलल्याच्या टीकेला उत्तर देताना.)मुख्यमंत्र्यांच्या भाषणातूनपतसंस्थांना त्यांच्याकडील ठेवींच्या २० टक्के इतकी रक्कम कर्ज म्हणून देता येते. त्या मर्यादेत त्यांनी शेतकºयांना दिलेली कर्जे माफ करण्याचा विचार केला जाईल. माजी सैनिकांना कर्जमाफी दिलेली आहे. विद्यमान सैनिक शेतकºयांना ती देण्यावर सरकार विचार करेल. नियमित कर्ज परतफेड करणाºयांना दिलेले प्रोत्साहनपर अनुदान कमी असल्याची टीका झाली. भविष्यात ते वाढविले जाऊ शकेल. आज शासनाची तिजोरी जेवढा जास्तीतजास्त आर्थिक ताण सहन करू शकते तेवढा दिलासा दिला आहे.